मुंबई : ‘‘महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरे जायचे असून, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यामागे ताकद उभी करा,’’ असे आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिले.
आगामी लोकसभा निवडणुकांबरोबरच पक्षबांधणीसाठी ठाकरे यांनी मावळबरोबरच बारामती मतदारसंघाचा आढावा घेतला. या वेळी खडकवासला िवधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे धरला.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने त्याठिकाणी आता ठाकरे गटाकडून उमेदवार शोधला जात आहे. या मतदारसंघात येणाऱ्या उरण, पनवेल, कर्जत, पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद किती आहे, याचाही आढावा घेण्यात आला. आघाडी असली तरी हा मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहावा, अशी भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली.
जिंकेल त्याची जागा हेच सूत्र : राऊत
‘‘लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल. कोणी किती जागा लढवायच्या यावर न ताणता जिंकेल त्याची जागा,’’ हे महाविकास आघाडीचे सूत्र असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या सूत्राबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी मजबूत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.