uddhav thackeray  ajit pawar
uddhav thackeray ajit pawar  sakal
मुंबई

मुख्यमंत्री बोलताना गुदगुल्या करतात; अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईत मराठी भाषा भवन केंद्राच्या भूमिपूजनाच्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याच्या शैलीवरुन चांगलीच फिरकी घेतली आहे. अजित पवार म्हणाले की, आपण बाळासाहेब ठाकरे यांची भाषा पाहिली आणि ऐकली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलताना गुदगुल्या करतात आणि टोमण्यांमधून शाल जोडीतून मारतात हेदेखील पाहत आणि ऐकत आहोत, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला आहे. ते मुंबईतील मराठी भाषा भवन केंद्राच्या भूमिपूजनाच्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचीदेखील फिरकी घेतली. (Ajit Pawar On Uddhav Thackeray Speaking Style )

डॉ. विश्वजीत कदम (Dr. Vishvjeet Kadam ) हे डॉक्टर लिहितात. आता मराठीत विद्यावाचस्पती विश्वजीत कदम म्हणावे लागेल असे म्हणत हे सर्वांना समजावे म्हणून त्यांना डॉक्टर लिहायला देतो असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांनादेखील मराठी भाषा (Marathi Language ) वाचण्यास, समजून घेण्यास प्रोत्साहित करावे असा सल्लादेखील त्यांनी यावेळी अमराठी अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठीला विरोध करणाऱ्यांनी विचार करण्याची गरज

पुढे बोलताना अजित पवार म्हणालेकी, अनेक जण रोजगारासाठी राज्याची राजधानी मुंबईत (Mumbia) येतात यामध्ये परराज्यातील नागरिकांचाही समावेश आहे. मात्र, येथे येऊन दोन पैसे कमावून ते आपल्या राज्याला पाठवायचे आणि वर मराठी भाषेला विरोध करायचा ही पद्धत योग्य नाही. त्यामुळे असा विरोध करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. राज्यात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, माणसाला विरोध का करता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT