shivsena election commission allot shivsena uddhav balasaheb thackeray name flaming torch symbol  
मुंबई

ShivSena: बाळासाहेबांपेक्षा उद्धव ठाकरेंनी शिवसेना दोन पावलं पुढे नेली - भास्कर जाधव

नाव आणि निशाणी बदलल्यानंतर आता शिवसेनेचा नवा जन्म झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसेना दोन पावलं पुढे नेली, असं विधान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत कार्यकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधात उद्धव ठाकरे गटानं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी जाधव यांनी भाषण केलं यावेळी ते बोलत होते. (Uddhav Thackeray took Shiv Sena two steps ahead of Balasaheb says Bhaskar Jadhav)

भास्कर जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी खूप कल्पकतेनं, संयमीपणे आणि खूप नियोजनबद्धरित्या बाळासाहेबांपेक्षा शिवसेना दोन पावलं पुढं नेण्याचं काम केलं. पण सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल समाजात शंका-कुशंका पद्धतशीरपणे निर्माण करणं त्यासाठी वेगवेगळ्या पतळीवर टीकाटिप्पणी करण्याचं काम सातत्यानं सुरु होतं. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव गोठवण्याचं काम झालं.

पण आता मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण निशाणी हे याच्या नावानं मोठे झाले त्यांनी ते गोठवण्याचं पाप केलं. पण नियतीनं तुमच्यासाठी नवं दार उघडलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं जे काही शिवसेनेनं होईल ते उद्धव ठाकरेंचं असेल, अशा करता नवीन संधी तुम्हाला दिलेली आहे. नव्या शिवसेनेचा जन्म झालेला आहे.

तुमच्या नेतृत्वाखाली आता नवीन शिवसेना उभी करावी लागणार आहे. हे होत असताना कार्यकर्त्यांना तडीपारच्या नोटीसा दिल्या जात आहेत. कोणावर ईडीची, सीबीआयची कारवाई, तर कोणावर इन्कम टॅक्सची कारवाई केली जात आहे. संजय राऊतांचा काय दोष आहे? 55 लाख रुपयांची रिटर्न एन्ट्री होती फक्त तुम्हीतर ५० कोटी एकेकाला दिलेत आणि ५५ लाखांसाठी तुम्ही त्यांना जेलमध्ये बसवलंय. का तर त्यांनी देखील शिवसेना सोडावी. नाहीतर मोठ्या त्रासाला सामोर जावं लागेल, असा इशारा त्यांना दिला. पण राऊतांनी मोडेल पण वाकणार नाही, हा पवित्रा घेतला. कुडाळमध्ये माझ्या घरावरही हल्ला झाला, त्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील घाबरता कामा नये, असं आवाहनही यावेळी भास्कर जाधव यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Woman Minister Husband Controversy : महिला मंत्रीच्या पतीचा इंग्लिश नजराणा, अनेकांसोबत ठेवले संबंध; मंत्री पत्नीला ठार करण्याचा रचला कट

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT