Rashmi-Uddhav-Thackeray 
मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना कोरोनाची लागण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसतो आहे. मुंबईतही दररोज रूग्णवाढीचा आकडा मोठा असल्याचं निष्पन्न होत आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ११ मार्च रोजी मुंबईच्या जे जे रूग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर १२ दिवसांच्या आतच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी काल रात्री पॉझिटिव्ह आली आहे. त्या सध्या वर्षा निवासस्थानीच होम क्वारंटाईन झाल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना २० मार्चला कोरोनाची लागण झाली. आदित्य ठाकरे यांनी स्वःत ट्विट करुन याची माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं. 'मला कमी तीव्रतेची कोविड-१९ ची लक्षणं जाणवत होती. त्यामुळे मी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली. त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी', असं ट्वीट त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत ११ मार्चला रश्मी ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. त्यानंतर १२ दिवसांच्या आत त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रश्मी ठाकरे सध्या उपचार घेत असून डॉक्टर त्यांच्या स्वास्थ्यावर लक्ष ठेवून आहेत.

आजच्या दिवसात मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत ३ हजार ५१२ नव्या रूग्णांची वाढ झाली. तर १ हजार २०३ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले. मात्र ८ रूग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. सध्या मुंबईत एकूण २७ हजार ६७२  अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT