Uddhav Thackerays angry reaction on ED action against Raut 
मुंबई

शिवसेनेचा गळा घोटण्याचा डाव : उद्धव ठाकरे

राऊतांवरील ईडी कारवाईवर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटायचा हा डाव आहे. ही सर्व कारस्थाने उलथून टाकण्याची आज गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो हेसुद्धा आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा संताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केला.

ठाण्यातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार राजन विचारे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी ईडीच्या कारवायांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की आपण आज इथे बोलत आहोत आणि संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पाहुणे येऊन बसलेत. कालपासून एक सुरुवात झाली आहे. हे काय कारस्थान आहे. काल राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी माणसांचा अपमान केला. त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश बोलले होते की विरोधी पक्षाला दुश्मन समजू नका, पण आता विरोधी पक्ष तर लांबच आहे, पण एकेकाळी मित्रपक्ष होता त्याचासुद्धा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय.

दडपणाला घाबरणारा बाळासाहेबांचा आणि ठाण्यातील आनंद दिघेंचा शिवसैनिक असूच शकत नाही. आनंद दिघे दोन वर्षे तुरुंगात होते पण घाबरले नाहीत. म्हणून त्यांना धर्मवीर म्हणतात. मेलो तरी बेहत्तर शिवसेना सोडणार नाही. पक्षाची निष्ठा कशी असते हे दाखवणाऱ्या धर्मवीरांचे नाव त्यांच्या तोंडी ते शोभत नाही.

- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT