Uddhav Thackery
Uddhav Thackery 
मुंबई

नाराजी मुंबईत ठेवत उद्धव दिल्लीत

ब्रह्मदेव चट्टे

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात चर्चेसाठी पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्वेसर्वा आज (सोमवार) 'मातोश्री'बाहेरच्या बैठकीला उपस्थिती लावत आहेत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत यासंदर्भात झालेल्या बैठकीत भाग घेत आहेत.  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी (सहा एप्रिल) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा याबद्दल एनडीएने बैठक आयोजित केल्याचे सांगून बैठकीसाठी शहा यांनी उद्धव यांना निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाला प्रतिसाद देत उद्धव यांनी एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहत सेनेच्या पंपरेला दिला छेद दिला. 
एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला दिल्लीचे नेते 'मातोश्री'वर येत असत. मात्र, पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुख राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीच्या बैठकीला दिल्लीत गेले. महाराष्ट्रातील सत्तेत छोट्या भावाची भूमिका निभवणाऱ्या शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीवरून भाजपला चांगलेच कोंडीत पकडले होते. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशातही शिवेसेनेच्या आमदारांनी सरकारविरोधी गोंधळ घालत कामकाज रोखून धरले होते. भाजपने सरकार पडण्याची शक्यता लक्षात घेत विरोधी पक्षातील काही आमदार गळाला लावल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्याने शिवसेने आपल्या विरोधाची धार कमी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या मूक संमतीने कर्जमाफीचा विषय गुंडाळत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 
अर्थसंकल्पामध्ये शेतीच्या गुंतवणुकीवर भर देत सेना आमदारांना शांत करण्यात करण्यात भाजप यशस्वी झाला. तरीही शिवसेनेच्या गोटातून सरकारविरोधी सुर आळवण्यात येत होता. मात्र, भाजपच्या चाणक्यांनी सेना प्रमुखांची समजूत काढत अधिवेशन गुंडाळले. यामुळे राज्यातील विरोधी पक्षाने शिवसेनेच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना भाजपच्या आमदारांच्या तुलनेत विकासनिधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी केली होती. शिवसेनेच्या आमदारांना निधीच्या वाटपात डावलेले जात असल्याची तक्रार सेना आमदारांनी पक्षप्रमुखांकडे केली होती. त्यानुसार पक्षप्रमुख उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोन करून आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर, ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य प्रतोदसुनिल प्रभू आदींसह आमदारांचे शिष्टमंडळ मुंख्यमंत्र्यांना भेटले होते. मात्र आश्वासनाशिवायया शिष्यमंडळाला काहीच मिळाले नव्हते. त्यामुळे उद्धव बैठकीला जाण्याचे टाळतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र या शंकेला उध्दव यांनी पूर्णविराम दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT