Central Railway sakal
मुंबई

Udyan Express:Udyan Express: चालत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकले,मुंबई-पुणे उद्यान एक्स्प्रेसमधील प्रकार..कारण धक्कादायक

दादर स्टेशनवर घडला धक्कादायक प्रकार, उद्यान एक्सप्रेममध्ये एका क्षुल्लक कारणावरुन एका मद्यधुंद व्यक्तीने तरुणीला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-पुणे उद्यान एक्सप्रेसमध्ये रविवारी (दि.६ ऑगस्ट) संध्याकाळी एक धक्कदायक प्रकार घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसमध्ये एका तरुणीवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणीने प्रतिक्रार केल्यावर त्या व्यक्तीने तिला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेमध्ये डब्यात चढण्यावरुन २९ वर्षीय तरुणीचा वाद एका माणसाशी झाला. गाडी दादर रात्री ८.३० वाजता स्टेशनवर पोहोचल्यावर लेडिज डब्यातून सर्व महिला खाली उतरल्या. त्यावेळी ही तरुणी डब्यात एकटीच होती. तिला एकटं पाहून या व्यक्तीने लेडिज डब्यात चढून तिच्यावर हल्ला केला.

मात्र, तरुणीने प्रतिकार केल्यावर या झटापटीत या हल्लेखोर व्यक्तीने त्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. सुदैवाने तरुणी प्लॅटफॉर्मवर पडली. जखमी झाल्याने ती बेशुद्ध झाली.

आरोपी त्यावेळी दारुच्या नशेत होता. लेडिज डब्यात चढताना झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केलं. पोलिसांनी या हल्लेखोराला छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसवरुन अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT