Ulhasnagar Police sakal media
मुंबई

उल्हासनगर : पोलिसांकडून 43 गुन्ह्यांची उकल; 26 लाखांचा मुद्देमाल सुपूर्द

दिनेश गोगी

उल्हासनगर : तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 43 गुन्ह्यांची (crime cases solved) उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर एका भव्य कार्यक्रमात पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते (ACP Prashant mohite) यांच्या हस्ते 26 लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींच्या सुपूर्द (complainant got robbery property) करण्यात आला आहे. त्यात सोन्या चांदीचे दागिने, 23 मोटारसायकल,15 मोबाईल, रिक्षा,1 कॅमेरा आणि दोन गुन्ह्यात चोरी झालेल्या कॅशचा समावेश आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचारी कृपाल शेकडे यांनी तांत्रिक विश्लेशन करून चोरी झालेले 15 मोबाईल जमा केले होते.हे मोबाईल फिर्यादींच्या परत करण्यासाठी एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती संजय गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्याकडे केली होती.

त्यात उल्हासनगर आणि मध्यवर्ती पोलिसांनीही चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याने शहीद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल येथे काल सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमात उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या 12 गुन्ह्यातील 10 लाख रुपये,मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या 11 गुन्ह्यातील 9 लाख रुपये व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या 20 गुन्ह्यातील 7 लाख रुपये असा 26 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या हस्ते 43 फिर्यादींच्या सुपूर्द करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड,उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम,मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmer Drowns : रोज नदीत पोहणाऱ्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Maharashtra Latest News Update: राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Jio Vs Airtel Plan: मोबाईल डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार; जिओ-एअरटेलने वाढवले ​​दर, व्होडाफोनही तयारीत

Crime News: प्रियकराच्या खूनप्रकरणी प्रेयसीसह दोघे जेरबंद; संभाजीनगरातील घटना, प्रेत सापडले मुंगीत, साखरखेर्डात होते आरोपी

CA Student Ends Life : २० वर्षीय तरुणाचा धक्कादायक अंत! गळफासाचा प्रयत्न फसला, मग सिलेंडरमध्ये कात्री खुपसून घडवला स्फोट

SCROLL FOR NEXT