commissioner ajij shaikh sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरात सकृतदर्शनी धोकादायक दिसणाऱ्या इमारतींचे होणार सर्वेक्षण

सकृतदर्शनी धोकादायक दिसणाऱ्या उल्हासनगरातील इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - सकृतदर्शनी धोकादायक दिसणाऱ्या उल्हासनगरातील इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहेत. त्यानुसार जूनपर्यंत इमारतींच्या सर्वेक्षणासाठी प्रभागनिहाय सहायक आयुक्त ऑन-द-फिल्ड उतरले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींविरुध्द पावसाळ्यापूर्वी पाहणी करुन नियमानुसार कारवाई करण्यात येत असते. पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी शहरातील ज्या इमारती सकृतदर्शनी धोकादायक दिसून येत आहेत, अशा इमारतींची पाहणी करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांनी शहर अभियंता व सर्व सहायक आयुक्त प्रभाग समिती यांना दिलेले आहेत.

या आदेशाच्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनिष हिवरे, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी सर्व सहायक आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या इमारती सकृतदर्शनी धोकादायक दिसत आहेत. तथापी, महापालिकेने घोषित केलेल्या यादीमध्ये नाव नाही, अशा इमारतीचे सर्वेक्षण करून यादी तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत.

त्यानुसार सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील इमारतींचे सर्वेक्षणास सुरुवात केलेली आहे. ही कारवाई जून 2024 पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT