मुंबई

उल्हासनगरः कोविड रुग्णालयाच्या ICU मध्ये स्फोट, 19 रुग्णांची सुखरुप सुटका

दिनेश गोगी

मुंबईः  उल्हासनगरमध्ये खासगी कोविड रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.  कल्याण-बदलापूर महामार्गावर शांतीनगर स्मशानभूमी चौकाजवळ असलेल्या मॅक्स लाईफ हे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातल्या कोविडच्या आयसीयू मधील वातानुकूलित यंत्रणेत स्फोट झाला. या स्फोटामुळे भीषण आग लागल्याची घटना कालरात्री उशिराने उल्हासनगरात घडली. अग्निशमन दल आणि शिवसेनेने धाव युद्धपातळीवर मदतकार्य करत 19 रुग्णांना बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

मॅक्स लाईफमध्ये 14 कोविड आणि 5 कोविडची लक्षणे असणारे रुग्ण उपचार घेत होते. त्याचवेळी आयसीयूमध्ये असलेल्या वातानुकूलित यंत्रणेत भीषण स्फोट झाला. रुग्णांसोबत डॉक्टर्स, स्टाफ यांच्यात भीतीचे वातावरण पसरले. धुराचे रूपांतर आगीत झाल्यावर तात्काळ अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप आसेकर आणि दलाचे कर्मचारी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शिवसैनिकांसोबत धाव घेतली. रोड बंद करून आणि रुग्णांना बाहेर काढून त्यांना कल्याण डोंबिवली येथील खासगी कोविड रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. अग्निशमन दलाने दोन तासात आग आटोक्यात आणली.

स्फोट आणि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. अत्याधुनिक मशिनरी जळून खाक झाल्याने नुकसान कितीचे झाले याचा अहवाल तयार करण्यात येत आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Ulhasnagar Explosion ICU Covid 19 max life Hospital 19 patients safely released

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates: काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून दहिसर परिसरात गुंडागर्दी

Arts Centre: बहुतांश कलाकेंद्रांत लावणीच्या नावावर बैठकाच! 'साेलापूर जिल्ह्यातील २६ केंद्रांना कायमस्वरूपी प्रमाणपत्रे'; पोलिसांकडून कारवाई गरजेची

Wrestling Championship: वजन जास्त भरल्याचा पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूला फटका; ऑलिम्पिक पदक विजेता जागतिक स्पर्धेसाठी अपात्र

SCROLL FOR NEXT