Ulhasnagar: ऑफिसमध्ये घुसून व्यावसायिकावर केला जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद ulhasngar
मुंबई

Ulhasnagar: ऑफिसमध्ये घुसून व्यावसायिकावर केला जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Mumbai Crime: याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Latest Crime News: बांधकाम आणि फार्म हाऊसचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची आणि ऑफिसची तोडफोड केल्याची घटना काल रात्री उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवघेणा हल्ला करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव रतन शेलार आहे.वसार गावात वास्तव्यास असणारे शेलार यांचे कॅम्प नंबर 5 मधील आकाश कॉलनीत ऑफिस आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास ते ऑफिसमध्ये आले असता आधीच दबा धरून बसलेल्या रोहित शिंदे,जयेश भामरे,रितेश शिंदे उर्फ सोन्या,आदित्य शिंदे उर्फ गोट्या आणि चार अनोळखी इसम यांनी रतन शेलार यांच्या ऑफिसमध्ये घुसून जीवघेणा हल्ला चढवला.

या हल्ल्यात शेलार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या भावावर देखील हल्ला करण्यात आला. तसेच हल्लेखोरांनी त्यांच्या ऑफिसची देखील तोडफोड केली.

रतन शेलार यांनी या हल्ल्याच्या मागे लुटमारीचा उद्देश असल्याचा आरोप केला आहे.हल्ल्यानंतर शेलार यांना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.याप्रकरणी हल्ल्यातील आरोपी रोहित शिंदे,जयेश भामरे,रितेश शिंदे उर्फ सोन्या,आदित्य शिंदे उर्फ गोट्या आणि चार अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी,कर्मचारी हे आरोपींच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: 'गट क' परीक्षेच्या अर्जासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! 'एमपीएससी'चा निर्णय, 2 हजार 929 पदांसाठी भरती

Vasmat Politics: गोवंश प्रकरणातील गुन्ह्यानंतर वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांमधील फरक तसेच त्याशी संबंधित जबाबदाऱ्यांचे स्वरूप, असे अनेक मुद्दे उपस्थित झाले - अनिल देसाई

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT