Ulhasnagar Firing Case Esakal
मुंबई

Ulhasnagar Firing Case : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Ulhasnagar Firing Case : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या सह चार आरोपीना उल्हासनगर प्रथम वर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . आज सकाळी या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज त्यांना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. याप्रकरणी आमदार गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा, संदीप सरवणकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज बुधवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते..

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आज सकाळी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रकरण संवेदनशील असल्याने ठाणे पोलीस आयुक्तालतून यासंबंधी आदेश काढण्यात आले होते. यावेळी उल्हासनगर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याशिवाय कोर्टात येणारे जाणारे मार्ग 200 मीटर लांबपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. तर या भागांमध्ये १कलम १४४ लागू करण्यात आले होते.

उल्हासनगर न्यायालयात दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी गायकवाड व इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, कोर्टाचे कामकाज सकाळी 11 वाजल्यानंतर सुरू होते. मात्र, आज गायकवाड यांच्या सुनावणीसाठी आज सकाळी 9 वाजता कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात आले होते. सुरक्षेच्या हेतूने गायकवाड यांना आज पहाटेच न्यायलयात आणण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT