ulhasnagar friendship bond of shrikant shinde lok sabha campaign  Sakal
मुंबई

Ulhasnagar : उल्हासनगरात दोस्ती का गठबंधनचे दोन रथ डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सज्ज,ओमी कलानीचा पुढाकार

युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या पुढाकाराने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ दोस्ती का गठबंधनचे दोन रथ उल्हासनगरात सज्ज झाले आहेत.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या पुढाकाराने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ दोस्ती का गठबंधनचे दोन रथ उल्हासनगरात सज्ज झाले आहेत.या रथांचे उद्घाटन ओमी कलानी यांचे चिरंजीव निव ओमी कलानी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.टीम ओमी कलानीच्या वतीने कमलेश निकम,मनोज लासी यांनी ही माहिती दिली आहे.

मुळात ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आहेत.पण श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मैत्रीचे संबंध असून ज्याप्रकारे त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना गवसणी घातली ते बघून त्यांना पाठींबा असल्याचे ओमी कलानी यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार टीम ओमी कलानी यांच्या वतीने डॉ.श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांचे फोटो असलेले दोस्ती का गाठबंधनचे 5 हजार स्टिकर्स तयार करण्यात आले असून ते वाहनांवर चिकटवण्यात येत आहेत.या स्टिकर्सचे अनावरण डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले होते.

शनिवारी 4 तारखेला डॉ.श्रीकांत शिंदे,ओमी कलानी यांच्या दोस्ती का गठबंधनचे दोन रथ तयार करण्यात आले असून त्यापैकी एक रथ हा कॅम्प नंबर 1 ते 3 सोबत म्हारळ,वरप,कांबा आणि दुसरा रथ हा कॅम्प नंबर 4,5 मध्ये डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ धावणार आहे.

या रथावर आमदार पप्पू कालानी,ओमी कलानी,टीम ओमी कालानीचे कमलेश निकम,मनोज लासी,सुमित चक्रवर्ती,अजित माखीजानी,संतोष पांडे,पितू राजवानी,मोहित पेसवानी,सुंदर मुदलियार,शिवाजी रगडे,होशियारसिंग लबाना,अजय लबाना,आनंद शिंदे आदी आळीपाळीने सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT