ulhasnagar icici bank atm caught fire due to short circuit fire brigade mumbai  Sakal
मुंबई

Ulhasnagar Fire Accident : उल्हासननगरात आयसीआयसीआय बँकेच ATM आगडोंबित जळून खाक

लागलेल्या आगडोंबित आयसीआयसीआय बँकेची एटीएम पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी उल्हासनगरात घडली. कॅम्प नंबर 4 येथील शासकीय प्रस्तुतीगृहाच्या बाजूला आयसीआयसीआय बँकेची एटीएम असून त्यास अचानकपणे दुपारच्या सुमारास आग लागली.

दिनेश गोगी

उल्हासनगर -लागलेल्या आगडोंबित आयसीआयसीआय बँकेची एटीएम पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी उल्हासनगरात घडली. कॅम्प नंबर 4 येथील शासकीय प्रस्तुतीगृहाच्या बाजूला आयसीआयसीआय बँकेची एटीएम असून त्यास अचानकपणे दुपारच्या सुमारास आग लागली.

अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांना ही माहिती समजताच,अग्निशमन दलाचे नितीन(बंड्या)गुजर,विकास जाधव,किरण मोरे,समीर घोरपडे,अविनाश राठोड यांनी धाव घेऊन पाईपाने पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत एटीएमची यंत्रणा जळून खाक झाली होती.हे एटीएम बाजारपेठेच्या मुख्य रोडवर असल्याने आग विझेपर्यंत रस्ता बंद करण्यात आला होता.

ही आग नेमक्या कोणत्या कारणास्तव लागली हे निश्चित सांगता येत नसले तरी उन्हाचा पारा वाढल्याने ही आग शॉर्ट सर्किटने लागण्याची शक्यता अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT