property tax Sakal
मुंबई

Property Tax : उल्हासनगर महानगरपालिकेची अभययोजना जाहीर! मालमत्ता करावर एकत्रित थकबाकी भरल्यास शंभर टक्के व्याज माफ

टॅक्स वसुलीचा जुना रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली.

दिनेश गोगी

उल्हासनगर - टॅक्स वसुलीचा मागच्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कंबर कसली असून त्यासाठी शनिवारी 28 तारखेला एक दिवसीय अभययोजना जाहीर करण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम एकत्रित भरल्यास त्यावर शंभर टक्के व्याज माफ करण्यात येणार असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक निलम कदम यांनी दिली.

2023-24 मध्ये तत्कालीन मालमत्ता कर उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या कालावधीत टॅक्सची 111 कोटींच्या वर वसूली झाली होती. ही आजमितीपर्यंतची सर्वाधिक वसूली आहे. विशेष म्हणजे प्रियंका राजपूत या महिला अधिकाऱ्यानंतर आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संकलक निलम कदम या महिला अधिकाऱ्याने उपकर निर्धारक व संकलक सचिन वानखेडे, मनोज गोकलानी आणि आठ कर निरीक्षक या टीम सोबत वसुलीची आगेकूच सुरू केली असून त्याची बोलकी आकडेवारी हाती आली आहे.

यापूर्वी 2023 मध्ये मालमत्ता कराची 1 एप्रिल ते 23 सप्टेंबर पर्यंत 46 कोटी 52 लाख रुपये वसूली झाली होती. आणि यावर्षी 2024 मध्ये 1 एप्रिल ते 23 सप्टेंबर 54 कोटी 80 लाख 94 पर्यंत वसूली झालेली आहे. 28 तारखेला असणाऱ्या एक दिवसीय अभययोजनेत किती कोटींची वसूली होते याकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हीच बोलक्या वसुलीची आकडेवारी पाहता पुण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळख निर्माण करणारे विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, कर निर्धारक व संकलक निलम कदम यांची टीम जुन्या 111 कोटींच्या वसुलीचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आगेकूच करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Project : शक्तिपीठ महामार्ग होणारच, मंत्री उदय सामंतांचे कोल्हापुरात वक्तव्य; सर्वांना विश्वासात घेण्याचे आवाहन

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Latest Marathi News Live Update : कणकवली शहरात चोरट्यांची दहशत; तब्बल ८ दुकाने फोडली

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

SCROLL FOR NEXT