Ulhasnagar Municipal Corproration sakal
मुंबई

Ulhasnagar News : महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टवर 12 तरुण कनिष्ठ अभियंताची नवी टीम, 5 तरूणींचा समावेश

उल्हासनगर महानगरपालिकेतील तीन विभागात कनिष्ठ अभियंत्यांची संख्या कमी असल्याने आता कॉन्ट्रॅक्टवर 12 तरुण कनिष्ठ अभियंत्यांची नवी टीम नियुक्त करण्यात आली आहे.

दिनेश गोगी

उल्हासनगर - महानगरपालिकेतील तीन विभागात कनिष्ठ अभियंत्यांची संख्या कमी असल्याने आता कॉन्ट्रॅक्टवर 12 तरुण कनिष्ठ अभियंत्यांची नवी टीम नियुक्त करण्यात आली आहे. त्यात 5 तरुणींचा समावेश आहे. त्यामुळे नागरी समस्यांच्या कामांची पाहणी आणि त्यावर उपाययोजना करण्याचे काम सोपे होणार असून त्यासाठी या अभियंत्यांना वाहन भत्ताही देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अझीझ शेख यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम, नगररचना आणि पाणी पुरवठा या तिन्ही विभागात कनिष्ठ अभियंत्यांचा अभाव होता. त्यामुळे सुरू असलेली कामे आणि नागरी समस्यांच्या कामांची पाहणी करण्याचा ताण संबंधित विभागात असणाऱ्या अभियंत्यांवर येत होता.

यावर मात करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात हर्षद प्रधान, राहुल जाधव, पल्लवी वैरागर, रुचिका कारंडे, कोमल आशान, नगररचना विभागात अभिजित अहिरे, सुमित मुकादम, निकिता गोवेकर, तेजल चौधरी, पाणी पुरवठा विभागात वैभव भादवे, हरेश मिरकुटे, अश्विन राठोड या 12 कनिष्ठ अभियंत्यांची कॉन्ट्रॅक्टवर नियुक्ती करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंते हे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, शहर अभियंता तरुण शेवकानी यांच्या, नगररचना विभागातील अभियंते हे सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, वरिष्ठ कनिष्ठ अभियंता संजय पवार यांच्या आणि पाणी पुरवठा विभागातील अभियंते हे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, कार्यकरी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT