मुंबई

Ulhasnagar News: राजकीय समीकरणं बदलणार? 'कायद्याने वागा'ने निवडणुकीसाठी कंबर कसली!

दिनेश गोगी - सकाळ वार्ताहर

Ulhasnagar news: महानगरपालिकेत सुरू असलेली कंत्राटी कामगारांची पिळवणूक थांबवण्यासाठी आंदोलने करणाऱ्या,नागरी समस्यांना हात घालून अनेक समस्या मार्गी लावणाऱ्या उल्हासनगरातील 'कायद्याने वागा' लोकचळवळने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा' या कार्यक्रमात येत्या पालिका निवडणुकीत शहरातील सर्व प्रभागात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

लोकचळवळीचे शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांच्या पुढाकाराने संकल्प लोकशाही प्रस्थापनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रणेते राज असरोंडकर प्रमुख मार्गदर्शक होते.राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांनी 'संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा.

या कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट केली.माध्यम समन्वयक प्रफुल केदारे संपूर्ण चर्चेचे सूत्रधार होते.यावेळी मंगला मुजुमदार यांची प्रभाग क्रमांक 18 च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

वालधुनी नदी,भ्रष्टाचार,प्रदुषण,प्रशासनिक अव्यवस्था,अनधिकृत बांधकामे,नियोजनशून्य विकास, अनारोग्य अशा विविधांगी मुद्यांवर संदेश मुकणे,शशिकांत दायमा,संजय वाघमारे,ॲड.वनिता ओवळेकर,प्रा.सिंधु रामटेके,अनिल शर्मा,उमेश देबनाथ,मुकेश माखिजा,कुमार रेड्डीयार,अभिजीत मोंडल,अरिदीप जाना,प्रकाश भोसले,ललित कवात्रा,राहुल परब,शैलेंद्र रुपेकर अशा अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली.

उपस्थितांच्या चर्चेला उत्तर देताना राज असरोंडकर म्हणाले की सामाजिक कार्यकर्त्यांनी समस्यांविरोधात लढत राहायचं आणि समस्यांना जबाबदार प्रवृत्तींना लोकांनी निवडून द्यायचं,हे आता थांबवलं पाहिजे.

यापुढे आपण तक्रारी करणाऱ्यांच्या नव्हें तर तक्रार निवारकांच्या भूमिकेत आलं पाहिजे.त्यासाठी निवडणुका हा प्रभावी मार्ग आहे.त्यासाठी शहरातील नागरिकांकडून शिफारशी मागवण्यात येणार असून त्यातून उमेदवारांची निवड व त्यांचं प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

हा खऱ्या अर्थाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.सामान्य जनतेची सत्ता आणणार !असं प्रतिपादन राज असरोंडकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT