Omi Kalani sakal
मुंबई

Ulhasnagar News : टीम ओमी कालानी वाटणार गरीब-अनाथांना दिड लाख नोटबुक्स

युथ आयकॉन ओमी कालानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महागड्या वस्तूंऐवजी नोटबुक्स गिफ्ट देण्याचे आवाहन उल्हासनगरातील हितचिंतकांना केले होते.

दिनेश गोगी

उल्हासनगर - युथ आयकॉन ओमी कालानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महागड्या वस्तूंऐवजी नोटबुक्स गिफ्ट देण्याचे आवाहन उल्हासनगरातील हितचिंतकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून ओमी यांना तब्बल दिड लाख नोटबुक्स गिफ्टमध्ये मिळाली आहेत.टीम ओमी कालानी यांच्या वतीने हे नोटबुक्स गरीब-अनाथ विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहेत.

लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारार्थ उतरणार आणि येणाऱ्या विधानसभेत आमदारकीची निवडणूक लढवणार अशी कमिटमेंट ओमी कालानी यांनी केलेली आहे. अशातच 11 एप्रिल रोजी असणाऱ्या वाढदिवसाला महागड्या गिफ्ट ऐवजी नोटबुक्स गिफ्ट देण्याचे आवाहन ओमी कालानी यांनी केले होते. त्यास हितचिंतकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. अनाथ मुलांच्या शाळांत आणि विटभट्टीवर काम करणाऱ्या व आदिवासी पाड्यात राहणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना हे नोटबुक्स वाटण्यासाठी टीम ओमी कालानी जाणार आहे.

दरम्यान कालानी महालात ओमी कालानी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर, भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, पदाधिकारी जमनू पुरस्वानी, प्रकाश माखीजा, चार्ली पारवानी, उबाठाचे मुख्य पदाधिकारी धनंजय बोडारे, राजेश वानखेडे, दिलीप मिश्रा आदी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार पप्पू कालानी, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा पंचम कालानी, टीम ओमी कालानीचे कमलेश निकम, मनोज लासी, सुमित चक्रवर्ती, अजित माखीजानी, पितू राजवानी, दिनेश लेहरानी, शिवाजी रगडे, जमिल खान, मोहित पेसवानी, सुंदर मुदलियार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

Bike tyre replacement : टू-व्हीलर गाडीचे टायर किती दिवसांनी बदलावेत? मोठं नुकसान होण्याआधीच जाणून घ्या

Mumbai News: बीएमसीची मोठी कारवाई! मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर बुलडोझर, व्हिडिओ व्हायरल

India Nepal Border Dispute : लिपुलेख-कालापानी वादात चीनची एन्ट्री? भारताने नेपाळला सुनावले; द्विपक्षीय यंत्रणा असताना तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

SCROLL FOR NEXT