मुंबई

Ulhasnagar: शिवसेना-भाजपा युतीत पुन्हा तणाव; विक्की भुल्लर यांच्या बॅनरवर आमदारांना खडे सवाल?

Latest Thane Update: भाजप आमदार कुमार आयलानी यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Ekanth Shinde Vs BJP: युवासेना कल्याण जिल्हा सचिव व रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष विक्की भुल्लर यांनी बॅनर झळकवले आहे.त्यात उल्हासनगरातील आमदार कुमार आयलानी यांना खड्ड्यांवरून घेरले असून त्यावरून अनेक खडे सवाल उपस्थित केले आहेत.त्यामुळे या बॅनर वरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

रिक्षा युनियनच्या वतीने विक्की भुल्लर यांनी दोन दिवसांपूर्वीच जयकुमार केणी,प्रमोद पांडे आदींसोबत आयुक्त डॉ.अझीझ शेख यांची भेट घेऊन खड्यांवाबत निवेदन दिले होते.रिक्षाचालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल लक्ष वेधले होते.आता मात्र विक्की भुल्लर यांनी आमदार कुमार आयलानी यांना टार्गेट करणारे बॅनर झळकावले आहे.

यामध्ये शहर वासीयांना मेट्रोचे स्वप्न दाखवता,पण सद्याच्या परिस्थितीत रिक्षा रोडवर धावू शकत नाही,काही दिवसांपूर्वी स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेणाऱ्या आमदारांनी शहाड येथील ब्रिजवर पाहणी दौरा करून दगडांनी खड्डे बुझवले परंतु उपयोग काय झाला?शहराला आपल्याकडून काम हवे आहे.पाहणी दौरा,फोटो सेशन नको,कृती हवी. खड्यांचे काय?असे सवाल उपस्थित केले आहेत

.बॅनर वरील मथळ्यामुळे हा बॅनर चर्चेचा विषय बनला असून त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजप आमदार कुमार आयलानी यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विक्की भुल्लर यांनी स्पष्ट केले की ते युतीविरोधात नाहीत.पण शहराच्या विकासासाठी हा बॅनर लावला आहे.त्यांनी असेही सांगितले की,युतीत भाजपचे तिकीट कापून शिवसेना शिंदे गटाला दिल्यास ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT