मुंबई

Ulhasnagar News : सौचालयाच्या भांड्यातील चिमुकली बालकल्याण समितीच्या ताब्यात; जीवदान देणाऱ्यांचा सन्मान

11 जानेवारी रोजी सुभाष टेकडी परिसरात आंब्रपाली नगर येथे असणाऱ्या सार्वजनिक सौचालयाच्या भांड्यात स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला टाकण्यात आले होते.

दिनेश गोगी

उल्हासनगर - मागच्या आठवड्यात सार्वजनिक सौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आलेल्या व उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर ठणठणीत झालेल्या चिमुकलीचा ताबा आज बालकल्याण समितीकडे देण्यात आला आहे. तसेच चिमुकलीला जीवदान देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सन्मान समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

11 जानेवारी रोजी सुभाष टेकडी परिसरात आंब्रपाली नगर येथे असणाऱ्या सार्वजनिक सौचालयाच्या भांड्यात स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला टाकण्यात आले होते. रुपाली थाटे या महिलेला ही चिमुकली दिसल्यावर प्रविण सुर्यवंशी,आकाश अहिरे यांनी धाव घेतली. प्रविण सुर्यवंशी यांनी चिमुकलीला भांड्यातून बाहेर काढल्यावर आकाशने संदीप डोंगरे यांना फोनवर कळवले.

डोंगरे यांनी घटनास्थळी पोहचून विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना फोनवर माहिती देऊन चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी नेत असल्याचे सांगितले. आणि प्रविण सुर्यवंशी,प्रकाश भागे,आकाश अहिरे यांच्या सोबत शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी अर्भकावर तात्काळ उपचार केल्याने अर्भक सुदृढ होऊ लागले. ठाणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाणे, सदस्य मनीषा झेंडे यांनी रुग्णालयात भेट देऊन चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस करून तिला कुशीत घेतले होते.

'बालकल्याण समितीकडे चिमुकलीचा ताबा'

9 दिवस यशस्वीपणे उपचार करण्यात आल्यावर विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत खंदारे, हवालदार राजेंद्र वारघडे, महिला पोलीस हवालदार, गीतांजली राठोड, तपास अधिकारी उपनिरीक्षक वाल्मीक सदगिर यांनी चिमुकलीला ठाणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाणे, सदस्य मनीषा झेंडे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. चिमुकलीला नेरुळ च्या विश्वबालक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.कारा गाईड लाईननुसार या चिमुकलीला बाल कल्याण समिती द्वारे दत्तक देण्याची प्रक्रिया हाताळली जाणार आहे.

'जीवदान देणाऱ्यांचा सन्मान'

दरम्यान बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी जयप्रकाश बैसाणे, सदस्य मनीषा झेंडे यांच्या वतीने या चिमुकलीला जीवदान देण्यासाठी पुढाकार घेणारे संदीप डोंगरे, प्रविण सुर्यवंशी,आकाश अहिरे यांचा सन्मान केला आहे. रुपाली थाटे या महिलेचाही सन्मान करण्यात येणार होता.पण प्रकृती कारणास्तव त्या येऊ शकल्या नाहीत. यावेळी जयप्रकाश बैसाणे,प्रकाश भागे आदी उपस्थित होते.

'संदीप डोंगरे यांच्याकडे प्रथमदर्शी पालकत्व'

दरम्यान 31 डिसेंबर 2018 मध्ये नाल्यात टाकण्यात आलेल्या एका अर्भकाला वाचवणाऱ्या शिवाजी रगडे यांना या अर्भकाचे पालकत्व देण्यात आले होते. रगडे यांनी या अर्भकाचे नाव टायगर ठेवले होते. या टायगरला इटली येथील दाम्पत्याने दत्तक घेतले आहे. त्याचप्रमाणे चिमुकलीला वाचवण्यासाठी पुढाकार घेणारे संदीप डोंगरे यांच्याकडे चिमुकलीचे प्रथमदर्शी पालकत्व देण्यात आले आहे. डोंगरे यांनी तिचे नाव आम्रपाली ठेवले असून तिला दत्तक घेण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT