ticket counter
ticket counter 
मुंबई

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर नोटा निर्जंतुकीकरणासाठी अनोखी शक्कल; 'अशी' होणार सॅनेटायझरची नोटांवर फवारणी..

प्रशांत कांबळे

मुंबई: कोरोनाच्या संभाव्य संक्रमानापासून बचाव करण्यासाठी मध्य रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. बनावट नोटा ओळखणारे अल्ट्रावाॅयलेट मशीनचा वापर करून नोटांवर सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. त्यामूळे संभाव्य कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होत आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर 49 रेल्वे स्थानकांवर 85 खिडक्या सुरू आहे. या सर्वच ठिकाणी य़ा मशिन आहे. कोरोना संक्रमणापासून बचावासाठी मध्य रेल्वेने तिकीट खिडक्यांवर असलेल्या या अल्ट्रावाॅयलेट मशीनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे.  

बनावट नोटा ओळखणारे छोटे प्रिंटर (अल्ट्रावॉयलेट मशीन) आहेत. या यंत्रातूनच सॅनिटाइजरची फवारणी नोटांवर होत असल्याने, तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ज्या रेल्वे स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे. अशा रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर या मशिन आधीच उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामूळे नोटांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग टळण्यासाठी मदत होणार आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

ultraviolet rays sanitizer machine at railway ticketing counter 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT