मुंबई

भिवंडीकर ऑनलाईन प्रणालीबाबत अनभिज्ञ! 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहर महापालिका कार्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना पाणी जोडणी व इतर विविध परवानगींसाठी "ऑनलाईन अर्ज' प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र पालिकेने सुरू केलेल्या या ऑनलाईन प्रक्रियेपासून शहरातील बहुतांश आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि करदाते नागरिक अनभिज्ञ आहेत. पालिकेत बांधकाम व इतर कामांच्या परवानगीसाठी गेलेल्या नागरिकांना काही कर्मचारी व अधिकारी "ऑनलाईन अर्ज करा', असे सांगून त्यांना वाटेला लावत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व कामगार वर्गातून संताप व्यक्त होत आहे. 

सरकारी आदेशानुसार भिवंडी महापालिकेने नागरिकांना नवीन नळ जोडणी, घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखला, बांधकाम व इमारत बांधकाम अशा विविध प्रकारच्या परवानगी देण्यासाठी संगणकांवर ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. या सुविधेबाबत जनजागृती न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक या सुविधेबद्दल अनभिज्ञ आहेत.

नागरिक विविध प्रकारच्या परवानगी घेण्यासाठी महापालिकेत गेल्यावर तेथील कर्मचारी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करा, असे सांगतात. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेबाबत काहीच माहिती नसल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे. भिवंडी हे कामगार-मजूर वर्गाचे शहर असून साक्षरतेअभावी अनेक जण या ऑनलाईन प्रक्रियेपासून अनभिज्ञ असल्याचे व्यावसायिक दिनेश शेट्टी यांनी सांगितले. 

पालिकेत नागरिक गेल्यावर अधिकारी व कर्मचारी वर्ग त्यांना अवमानकारक वागणूक देऊन परत पाठवतात. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत काही नागरिकांनी विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, निलेश चौधरी यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तात्काळ आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची भेट घेत या प्रकरणी लक्ष द्यावे, नागरिकांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारून त्यांना विविध प्रकारच्या परवानगी देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये नेहमी घोळ असतो. ऑनलाईन मालमत्ता कर भरून देखील ती थकबाकी दाखवत असल्याचे समाजसेवक जलील अन्सारी यांनी सांगितले. 

सर्व सामान्य नागरिकांचा सुविधेसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांचा पालिकेत येण्याचा वेळ व खर्च वाचतो. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांना सहकार्य करावे, असे आदेश दिले आहेत. 
- डॉ. प्रवीण आष्टीकर, 
आयुक्त, भिवंडी महापालिका. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT