मुंबई

अल्पवयीन पुतणीला बारमध्ये कामाला लावणाऱ्या काकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - एका अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने जबरदस्तीने लेडीज बारमध्ये काम करण्यास भाग पाडून, वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या नराधम काकाला अटक करून, पीडित मुलीची रबाळे एमआयडीसीतील लेडीज बारमधून सुटका केली. 

पीडित मुलीचे आई-वडील नसल्यामुळे ती कोपरखैरणे येथील आपल्या काकाकडे राहत होती; मात्र तिच्या काकाने तिला जबरदस्तीने रबाळे एमआयडीसीतील लेडीज बारमध्ये कामाला लावले व त्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून मौजमजा करण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने सह पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. व्हटकर यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या पथकाने पीडित मुलीचा शोध घेतला असता, ती रबाळे एमआयडीसीतील एका लेडीज बारमध्ये काम करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने या बारमधून पीडित मुलीची सुटका केली व तिच्या काकाला सापळा रचून ताब्यात घेतले. 

त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पीडित मुलीचे बनावट आधार कार्ड बनवून तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त दाखवून, तिला लेडीज बारमध्ये कामाला लावल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याच्यावर पोक्‍सो कलमासह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने या आरोपीची 18 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. या आरोपीने पीडित मुलीचे बनावट आधार कार्ड कुठून बनवून घेतले, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा; पुढील ६० ते ७२ तासांत तापमानात मोठी वाढ

New Price Update: 1 ऑक्टोबरपासून खिशाला फटका! बजेट बिघडणार? काय महागलं अन् काय स्वस्त झालं? पाहा

SCROLL FOR NEXT