काकाने अल्पवयीन पुतणीला नको ते करायला लावले 
मुंबई

काकाने अल्पवयीन पुतणीला नको ते करायला लावले

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने जबरदस्तीने लेडीज बारमध्ये काम करण्यास भाग पाडून, वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक करून, पीडित मुलीची रबाळे एमआयडीसीतील लेडीज बारमधून सुटका केली. 
 
आई-वडील नसल्याने पीडित मुलगी कोपरखैरणे येथील आपल्या काकाकडे राहत होती; मात्र त्याने तिला जबरदस्तीने रबाळे एमआयडीसीतील लेडीज बारमध्ये कामाला लावले.व त्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून मौजमजा करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आला. तिने पोिलसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने या बारमधून पीडित मुलीची सुटका करत काकाला सापळा रचून ताब्यात घेतले.  

पोलिसांच्या चौकशीत त्याने पीडित मुलीचे बनावट आधार कार्ड बनवून तिचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त दाखवून, तिला लेडीज बारमध्ये कामाला लावले. त्यानुसार त्याच्यावर पोक्‍सो कलमासह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने या आरोपीची १८ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT