मुंबई

आराम तर सोडाच, साधे उभेही राहावत नाही! ठाण्यात महिलांची कुचंबणा

शर्मिला वाळुंज

ठाणे : गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने महिलांसाठी पालिका हद्दीत स्वच्छतागृहांसह "आराम कक्ष' उभारले. पाच-सहा महिने हे कक्ष बंद अवस्थेत असल्याने त्यांची सध्या दुरवस्था झाली असून स्वच्छतागृहही अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत. कळवा नाका येथील आराम कक्षाची अवस्था पाहता त्याच्या आजूबाजूलाही महिला उभे राहणे पसंत करीत नाहीत. महिला नोकरदारवर्ग कामानिमित्त आता बाहेर पडू लागला असून या कक्षाची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे. 

ठाणे पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरामध्ये महिला स्वच्छतागृहासह आराम कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्दळीच्या भागात महिलांसाठी 15 लाख रुपये खर्च करून 11 स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये सहा ते सात महिला बसू शकतील, अशी आसन व्यवस्था असून विशेष म्हणजे ही स्वच्छतागृहे अन्य ठिकाणीही हलविता येतील, अशा पद्धतीने त्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.

मात्र, कोरोना संक्रमणामुळे गेले पाच-सहा महिने या आराम कक्षांचा वापरच नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. येथील स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य असून दारूच्या बाटल्यांचाही खच पडलेला आहे. 

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महिला कामानिमित्त बाहेर पडत आहेत. त्यांच्याकडून या स्वच्छतागृहांचा वापर होऊ शकतो. कळवा नाका येथे महिलांसाठीचे आरामकक्ष उभारण्यात आले आहे. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या, रिक्षाचालक महिलांसाठी हे स्वच्छतागृह सोयीचे होते; परंतु त्याचीही दुरवस्था झाली आहे. या स्वच्छतागृहांची पालिका प्रशासनाने त्वरित दुरुस्ती व स्वच्छता करावी, अशी मागणी महिला प्रवासी करीत आहेत. 

कळवा नाका येथील स्वच्छतागृहाची दुरवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून आहे. येथे रिक्षा टॅक्‍सी संघटनेने कार्यालयही थाटल्याने महिलांना त्याचा वापरच करता येत नाही. पालिका प्रशासनाने याची त्वरित दुरुस्ती करून महिलांसाठी ते खुले करावे. 
- रचना पुजारे, महिला प्रवासी, कळवा 

महिलांसाठी पालिका प्रशासनाने आराम कक्ष, स्वच्छतागृहांची सोय केली; परंतु त्यांना अनेकदा टाळेच असते. त्यांची स्वच्छताही राखली जात नाही. या स्वच्छतागृहांच्या साफसफाई, डागडुजीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. 
- राही खानोलकर, महिला प्रवासी, ठाणे 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,1,0! १२ चेंडूंत ११ निर्धाव! lauren bell ने दिला मुंबई इंडियन्सला जबर धाव; विकेटही घेतली अन्...

Pune News : एआय आणि डेटाच्या बळावर महाराष्ट्र होणार 'इनोव्हेशन हब'; डॉ. श्रीकांत पाटील यांनी मांडला रोडमॅप!

Latest Marathi News Live Update : भाजपचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

Ayodhya Non-veg Ban: मोठी बातमी! अयोध्येत मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी; उल्लंघन केल्यास..., का निर्णय घेतला?

Chandrapur Kidney Racket Case : ''निवडणुकीच्या कामाच्या व्यस्त असल्याने भेटीला येऊ शकलो नाही'', किडनी पीडितांना भेटताच पालकमंत्र्यांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT