Uninterrupted Power Supply in Badlapur and Ambernath. esakal
मुंबई

Mumbai Power Supply : बदलापूर, अंबरनाथकरांना अखंडित वीजपुरवठा

Badlapur Ambernath Electricity : महापारेषणच्या २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा

Uninterrupted Power Supply : बदलापूर, अंबरनाथ मध्ये सारखी वीज पुरवठा खंडित होत असल्याने स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता वडवली आणि आंबेशिव उच्चदाब वाहिन्यांमधून वीजपुरवठ्याला सुरुवात करण्यात आली आहे. महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा ४ मे रोजी कार्यान्वित केला आहे. यामध्ये ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वित झाला आहे.

त्यामुळे वडवली व आंबेशिव या दोन २२ केव्ही उच्चदाब वाहिन्यांमधून सुरळीतपणे वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले आहे. परिणामी महापारेषणच्या मोरिवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसई आणि कात्रपमधील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्स्फॉर्मर शनिवारी कार्यान्वित केला आहे. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी वडवली आणि आंबेशिव या उच्चदाब वीजवाहिन्या ही शनिवारीच कार्यान्वित करण्यात आल्या. परिणामी या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या मोरिवली उपकेंद्रातील भार आता कमी झाला.

मोरिवली उपकेंद्रावरील भार कमी झाल्यामुळे विजेच्या अधिक मागणीच्या कालावधीत बदलापूर, अंबरनाथ, कानसई आणि कात्रप परिसरातील ग्राहकांचा बाधित होणारा वीजपुरवठा यापुढे सुरळीतपणे सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT