वसई ः वाचनवृध्दीसाठी सायकल सफर करणारे तरूण.
वसई ः वाचनवृध्दीसाठी सायकल सफर करणारे तरूण. 
मुंबई

वाचनवृद्धीसाठी तरूणांनी हाती घेतली सायकल...

सकाळ वृत्तसेवा

वसई ः व्हॉट्‌सऍप, फेसबुक, यू-ट्युब यांसारख्या समाजमाध्यमांमध्ये अडकून पडलेल्या तरुणाईला साहित्याकडे, पुस्तकांकडे वळवण्यासाठी वसईचे राजू नाईक, मंगेश नाईक आणि प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. वाचनसंस्कृती रुजवण्याबरोबरच ती वद्धिंगत करण्यासाठी हे तिघे मुंबई ते गोवा सायलक सफर करून प्रवासात भेटणाऱ्यांना त्यांनी वाचन करा, असा संदेश दिला आहे. 

वसईतील सामवेदी ब्राह्मण समाजातील तीन तरुणांनी मुंबई ते गोवा हा 550 कि.मी.चा प्रवास सायकलिंग करत सात दिवसांत पार केला. गेटवे ऑफ इंडियावरून फेरी बोटीने मांडव्याला उतरल्यावर त्यांनी सायकल सफारीला सुरुवात केली. दिवेआगर, केळशी, गुहागर, गणपतीपुळे, जैतापूर, मालवण, गोवा महामार्गाने हा प्रवास केला.

दैनंदिन वापराच्या वस्तू व इतर सामान सोबत घेऊन त्यांनी वाचनवृद्धीसाठी केलेल्या प्रवासास नागरिकांनी प्रोत्साहन दिले. ठिकठिकाणी त्यांचे कौतुकही करण्यात आले. प्रवासादरम्यान शाळेतील विद्यार्थी, नागरिक आदींना तिघांनी भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधतांनाच वाचन केल्याने आपल्याला चांगले विचार मिळतात, त्याची समाजात देवाण-घेवाण करता येते, समाजासोबत आपण पुढे जातो, असे सांगत त्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने पुस्तक, वर्तमानपत्र वाचावे, असाही सल्ला त्यांनी दिला. 

माणूस वाचनापासून दूर जात आहे. व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून वाचनालय अथवा घरीच पुस्तक, रोजच्या वर्तमानपत्राचे वाचन व्हायला हवे. टीव्ही, मोबाईलमध्ये अडकून पडू नका, हा संदेश आम्ही सायकल प्रवासादरम्यान मुंबई ते गोव्यात भेट झालेल्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला. 
- राजू नाईक, वसई, सायकलस्वार 

unique campaign to promote reading is done in vasai

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Party Anniversary : मुंबईमध्ये आवाज कुणाचा? दोन्ही शिवसेना आज वर्धापनदिनाला करणार शक्तिप्रदर्शन

Wayanad Loksabha Election : वायनाडवरून काँग्रेस-भाजपमध्ये वाक्‌युद्ध; भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा केला आरोप

BJP Party : नेतृत्वबदल नाहीच! भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय

Sunil Tatkare : ‘राष्ट्रवादी’चे आमदार अजित पवारांसोबत

OBC Reservation : चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही - लक्ष्मण हाके

SCROLL FOR NEXT