police
police esakal
मुंबई

Mumbai News : सेवेतून निवृत्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून अनोख्या पद्धतीने निरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सेवेतून निवृत्त होताना पोलिस चालकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून निरोप घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फुटेजने तो क्षण टिपला आहे जेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने आपल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यासाठी स्वतः चालक बनून गाडी चालवली.

उल्लेखनीय बाब ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने निवृत्त होत असलेल्या चालकालाच नाही तर त्याच्या कुटुंबाला शेवटच्या दिवशी घरी सोडण्यासाठी ड्रायव्हिंग सीट घेत स्वतः गाडी चालवली. मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यातील ही सुखद घटना आहे.

सुनील मोरे यांनी 36 वर्ष पोलीस दलात कर्तव्य बजावल्यानंतर शुक्रवारी त्यांची सेवानिवृत्ती झाली. त्यांच्या टीमकडून या वेळीत्यांचा सन्मान करण्यासाठी निरोप समारंभ गावदेवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी आयोजित करण्यात आला.

पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत यादव यांनी मोरे यांना पोलीस कॉलनी, वरळी येथील त्यांच्या घरी स्वतः गाडी चालवत नेले. सोशल मीडियावर व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यादव यांनी नेटकऱ्यांची मने जिंकली. मुंबई पोलिसांच्या अधिकृत हँडलनेही ही क्लिप रिट्विट केली आहे. सर्वत्र गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत यादव यांचे त्यांच्या कृत्याबद्दल कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT