मुंबई

डिजीटल स्त्री शक्ती! सायबर सुरक्षेसाठी राज्य महिला आयोगाचा अनोखा उपक्रम

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा


मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ मंगळवारी (ता. 21) राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील 10 शहरांतील पाच हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम सुरु होत आहे. याअंतर्गत पाच हजार तरुणींना 100 वेबिनारच्या माध्यमातून ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. शुभारंभाचा वेबिनार मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार असून यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मार्गदर्शन करतील. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलिस सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकरही उपस्थित राहणार आहेत. 

इंटरनेटबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सायबर सखी उपक्रमामध्ये राज्यातील 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daughters Property Rights India : …तर मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळणार नाही, नवीन कायदा काय सांगतो?

जुन्या ५०० अन् १००० च्या नोटा पुन्हा बदलून मिळणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

"मी खूप दारू पिऊ लागले" धुरंधर फेम गायिकेने केला व्यसनाधीनतेबद्दल खुलासा "माझ्या पालकांनी माझं मन मोडलं"

Punjab Kings: पंजाब किंग्सचा दबदबा! IPL 2026 मध्ये कोणालच न जमलेला कारनामा श्रेयस अय्यरच्या शिलेदारांनी करून दाखवला

PM Kisan: 23वा हप्ता लवकरच! मात्र या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये; कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT