विरार ः ‘एकता दौड’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्पर्धक. (छायाचित्र ः विजय गायकवाड) 
मुंबई

हरित वसईसाठी आबालवृद्धांची धाव

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : ‘हरित वसई, ग्रीन वसई’चा ध्यास घेत सामाजिक एकतेचा संदेश देत विरारमध्ये रविवारी (ता.१९) निघालेल्या एकता दौडमध्ये सहा वर्षांच्या चिमुकल्यापासून ७० वर्षांच्या ज्येष्ठांनी उत्साहाने सहभाग घेतला. बोचऱ्या थंडीतही ५ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली. या वेळी ‘मुली वाचवा, मुली जगवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे विविध संदेश देत सामाजिक जनजागृतीही स्पर्धकांकडून करण्यात आली.  

‘विवा गिरी विहार उत्सव समिती’ आणि ‘बहुजन विकास आघाडी’च्या माध्यमातून, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या पुढाकारातून विरार पूर्व लिंक रोडवरून ‘एकता दौड’ची सुरुवात झाली. विविध १२ गटांत स्पर्धा झाली. बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता पिवळा झेंडा दाखवून ५ किलोमीटरची पहिली दौड सोडण्यात आली. त्यानंतर विविध गटातील स्पर्धा झाल्या.

सामाजिक एकतेचा संदेश जावा, सर्वांना आरोग्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने स्पर्धा घेतल्याचे संयोजकांनी सांगितले. स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह आणि आनंद वाखाणण्याजोगा होता. अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत, अशी इच्छा स्पर्धकांनी व्यक्त केली. स्पर्धेसाठी माजी सभापती चिरायू चौधरी, नगरसेविका रजनी पाटील, मीनल पाटील, बविआचे ज्येष्ठ कार्यकर्ते भालचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पर्धेतील विजेते
स्पर्धेत ६ ते १२ वयोगटात मुलांमध्ये संकेत शिगवण, तनिष्क शेडगे, अथर्व मांगले, मुलींमध्ये वैष्णवी वलाटे, सानिया पडवले, कशीरा कोलापटे, १२ ते १७ वयोगट मुलांमध्ये विक्रांत कुलबीर सिंग नेगी, सुजित कामती, अक्षय पाटील, मुलींमध्ये रोशनी जाधव, रेशमा वड, वृषाली उगले, १८ ते ३५ वयोगट महिलांमध्ये कांचन हरपाले, सुमन सिंग, प्रियंका मडके, पुरुषांमध्ये नरेंद्र उगले, प्रकाश दयात, संदेश उगले, ३६ ते ५० वयोगट महिलांमध्ये श्रद्धा राघव, प्रेरणा मालोडकर, सुषमा शिंदे, पुरुषांमध्ये श्‍याम जाधव, महेश किणी, हेमंत पाटील यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले.

ज्येष्ठांची कामगिरी 
५१ ते ६० ज्येष्ठ नागरिक महिलांमध्ये उल्का वैद्य, ज्योती पाटोळे, अमिता केल्लूरकर, पुरुषांमध्ये रामचंद्र साहानी, मोरेश्‍वर पाटील, दत्ताराम अंगाने, ६१ वर्षांवरील पुरुष गटात नरेंद्र पाटील, मुक्तार शेख, जयप्रकाश आंभिरे, महिलांमध्ये शीला वर्तक, प्रतीक्षा राऊत, उज्ज्वला महाले यांनी अनुक्रमे यश मिळवले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT