vijay wadettiwar 
मुंबई

अनलॉकच्या गोंधळानंतर विजय वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया

कार्तिक पुजारी

मुंबई- मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात काल लॉकडाऊनबाबत गोंधळ निर्माण झाला होता. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, अनलॉकबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे दुपारपर्यंत अधिसूचना निघेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबतही वडेट्टीवार यांनी भाष्ट केलं. विरोधकांचं ते कामच आहे. त्यात त्यांची काही चूक नाही, पण श्रेयवादाची भूमिका वगैरे काही नाही, असं ते म्हणाले आहेत.

राज्यातील अनलॉकच्या प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला असून ते यावर विचार करतील आणि अंतिम निर्णय घेतली. आज दुपारपर्यंत अनलॉकबाबत अधिसूचना निघेल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केल. त्यामुळे गुरुवारी विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनलॉकबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाच लेव्हलच्या वर्गवारीनुसार विविध जिल्ह्यांतील लॉकडाउन उठवला जाईल, अशी घोषणा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. या घोषणेनंतर काही वेळातच राज्य सरकारच्या DGIPR कडून हे निर्बंध हटवण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच, नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना कळवण्यात येतील, असं DGIPR कडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे राज्यात अनलॉकबाबत गोंधळ निर्माण झाला होता.

विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात होते. पण, राज्य सरकारने अनलॉकचा प्रस्ताव विधाराधीन असल्याचं म्हटल्यानं गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विरोधकांना टीकेची संधी मिळाली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर यावरुन हल्लाबोल केला."काय सुरू, काय बंद... कुठे आणि केव्हापर्यंत... लॉक की अनलॉक... पत्रकार परिषद की प्रेस रिलीज... अपरिपक्वता की श्रेयवाद", असे पाच सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT