Rain Update Maharashtra 
मुंबई

पुढील 3-4 तासांत रायगड, नाशिक, पुणे घाटात मुसळधार पावसाची शक्यता - IMD

मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक काही भागातही पाऊस पडेल - IMD

सकाळ डिजिटल टीम

मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक काही भागातही पाऊस पडेल - IMD

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम घाटतही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असून पाऊस सक्रिय झाल्याने कोकणपट्ट्यात अतिवृष्टी होत आहे. (Rain Update Maharashtra)

मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, आता रायगडच्या काही भागासह नाशिक-पुणे घाट परिसरात आणि लगतच्या उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुन्हा एकदा जोरदार सरी कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पुढील 3 ते 4 तासांत या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत दाट ढग जमा झाल्यामुळे कोकण-गोवा आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. तर, मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आदी भागातही पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या परिसरात पुढील तीन-चार तासांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासून मुंबईत दमदार पाऊस पडला आहे. मुंबईत सरासरीपेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद झाली. तसेच पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT