uran msrtc st depot passenger safety campaign 2024 raigad esakal
मुंबई

Uran News : उरण एसटी आगारात सुरक्षितता अभियान २०२४ चे शुभारंभ

मुंबई विभागात उरण आगारात "सुरक्षीतता अभियान- २०२४" चे अभियान राबविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Uran News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यपध्दतीमध्ये नविन वर्षाच्या सुरवातीला "रस्ते वाहतुकीत सुरक्षीत प्रवास" हा अत्यंत महत्वाचा भाग म्हणुन प्रवाशांची सुरक्षीत वाहतुक सेवा करणारे महामंडळ म्हणुन रायगड परिवहन.

बसेसचे रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रायगड परिवहन महामंडळाकडुन दरवर्षी अपघात नियंत्रण उपाययोजना राज्यभर राबविण्यात येते. त्याकरीता सुरक्षीतता अभियान राबविण्यात येते. यावर्षी रायगड परिवहन. मुंबई विभागात उरण आगारात "सुरक्षीतता अभियान- २०२४" चे अभियान राबविण्यात आले.

या अभियानाच्या शुभारंभाकरीता उरण तालुक्यातील जेष्ठ साहित्यीक व रायगडभुषण एल्. बी. पाटील, द्रोणागिरी स्पोर्टस क्लब असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत , ग्राम अध्यक्ष मोहन भोईर व मुंबई विभागाचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेंद्र भामरे यांनी उपस्थिती दर्शवुन सुरक्षितता मोहीम फलकाचे अनावरण केले.

उरण आगारातील अपघात विरहीत सेवा कर्तव्य देणारे जेष्ठ चालक भिलारे, अमोल काटे, शिवाजी भोसले, सुनिल पाटील, कैलास भालेराव यांना गुलाब पुष्प व सुरक्षीत सेवा बिल्ले देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच उरण आगारात कार्यरत असलेल्या महिला यांत्रिक कर्मचारी कादंबरी हर्षल म्हात्रे यांना "भुमिकन्या" पुरस्कार घोषित झाल्याने त्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रा. प. उरण आगारात "दिवाळी जादा हंगामात उत्कृष्ठ" उत्पन्न आणणारे वाहक आर. एस. तिवारी, व्हि. आर्. भाबड व एस. पी. पालवे यांनाही सन्मानित करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी उरण आगाराच्या कार्यप्रणाली बाबत कौतुक केले. आगाराचे अपघात विरहीत सेवा दिल्याबद्दल व इंधन बचतीत पारितोषीक मिळण्याबद्दल अभिनंदन करुन यशोप्राप्तीकरीता शुभेच्छा दिल्या. उरण आगाराचे पालक अधिकारी राजेंद्र भामरे यांनीही कर्मचाऱ्यांना प्रबोधन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT