Uran murder case Latest Update esakal
मुंबई

Uran Murder Case : मोहसीनचा संबंध नाही? यशश्री शिंदे खून प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांचा पोलिसांनी केला उलगडा

Latest news and updates on the Uran murder case : यशश्री ही २५ जुलै रोजी गायब झाली होती. तिच्या कॉल रेकॉर्डमधून पोलिसांना एक नंबर सापडला जिच्यावर तीने दीर्घकाळ संवाद साधला होता.

रोहित कणसे

उरणमधील २० वर्षीय तरुणी यशश्रीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात कर्नाटकातून संशयित आरोपी दाऊद शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेत त्याला कसे पकडले याबद्दल माहिती दिली आहे. यासोबतच हत्या का झाली असावी? मुलीचे अपहरण झाले होते का? याबद्दल देखील पोलिसांनी भाष्य केलं आहेय.

यशश्री ही २५ जुलै रोजी गायब झाली होती. तिच्या कॉल रिकॉर्डमधून पोलिसांना एक नंबर सापडला जिच्यावर तीने दीर्घकाळ संवाद साधला होता. या नंबरची चौकशी केल्यावर तो नंबर दाऊद शेखचा असल्याचे निष्पन्न झाले. दाऊद शेखचा फोन यशश्री गायब झाल्यापासून बंद होता. यामुळे पोलिसांनी दाऊद शेखचा शोध सुरु केला होता.

दरम्यान २७ जुलै रोजी आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुरूवारपासून आठ-नऊ पथके यासाठी काम करत होते. यादरम्यान नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिकांची चौकशी केल्यानंतर दोन-तीन संशयित आम्ही निश्चित केले होते. त्याकरिता नवी मुंबई, कर्नाटक येथे पथक पाठवण्यात आले होते. दोन पथके तिथं मागील पाच दिवसांपासून कॅम्प करून होते आणि आपण इथून त्यांना इनपुट्स देत होतो. त्याचा आधार घेऊन आज सकाळी आम्ही मुख्य संशयित दाऊद शेख याला ताब्यात घेतलं आहे अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दिपक साकोरे यांनी दिली.

घटना घडल्यानंतर आरोपीचे लोकेशन सापडत नव्हते, तो कर्नाटकचा आहे इतकंच माहिती होतं. सर्वांकडे चौकशी केली, त्याच्या मित्रांनी काही माहिती दिली. त्याआधारे कर्नाटकातील शहापूर येथील गावातून पहाटे आरोपीला ताब्यात घेण्यात आले असेही साकोरे यांनी सांगितले.

मोहसीनचा संबंध आहे का?

मोहसीन हा मयताच्या संपर्कात होता. असे संपर्कात होते त्या सर्वांशी आम्ही चौकशी करत होतो. कुठलाही अँगल आम्हाला सोडायचा नव्हता. तीन-चार संशयित आम्हाला वाटत होते. त्यापैकी हा जो संशयित आम्ही ताब्यात घेतला आहे त्याची आम्ही चौकशी केली, त्याने कबुली देखील दिली आहे. यामध्ये सध्यातरी दुसरा कोणी संशयित नाही असेही त्यांनी सांगितले.

हत्या का झाली?

मयत आणि आरोपीत ओळख, मैत्री होती. मागचे तीन-चार वर्ष मयत मुलगी ही या मुलाच्या संपर्कात नव्हती. त्याच्यातूनच हे झालं असेल असं वाटतं असे दीपक साकोरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त यांनी सांगितले.

मुलीचे अपहरण केलं होतं का?

दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या जवळच भेटायचं ठरवलं. यामध्ये अपहरणाचा प्रकार घडला नाही. ते दोघं एकमेकांना ओळखत होते, त्यामधूनच ही घटना घडली आहे. दोघांमध्ये वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं असेही दिपक साकोरे यांनी सांगितलं.

आरोपीने बदला घेतला का?

२०१९ला आरोपीवर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला, आणि त्यानंतर त्याला जेलमध्ये जावं लागलं, या रागातून त्याने हे कृत्य केले का? या प्रश्नावर उत्तर देताना पोलिस आयुक्तांनी सांगितलं की, अजून पूर्ण चौकशी झाली नाहीये, त्यामुळे याचं उत्तर देणे घाईचे ठरेल, यासाठी वेळ लागेल. चौकशी झाल्यानंतर याबद्दलची माहिती समोर येईल. तसेच सध्याच्या प्राथमिक तपासात हत्येत दुसऱ्या कोणाचा सहभाग अढळून आला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT