Farmers Help sakal
मुंबई

Farmers Help : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा;राज्यपाल बैस यांना काँग्रेसचे निवेदन

सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यग्र आहे. राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यग्र आहे. राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली.

दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष करत असताना राज्य सरकार मात्र अजगरासारखे सुस्त पडून असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, बागायती शेतीला एकरी ५० हजार रुपये तसेच फळबागांना एकरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व पाण्याची सोय करावी, खते आणि बियाणे सरकारने पुरवावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

महापुरुषांचे पुतळे पुनर्स्थापित करा

संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संसद भवन परिसरातील पुतळे केंद्र सरकारने हटविले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. सरकारने तत्काळ हे पुतळे पुनर्स्थापित करावेत, अशी मागणी काँग्रेसने स्वतंत्र निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT