Maratha Reservation Esakal
मुंबई

Maratha Reservation: मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक; हालचालींना वेग

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत एक आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. सरकारला दिलेल्या मुदतीमध्ये सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. अशातच, जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.

साम टिव्हीने सूत्रांच्या माहितीनुसार दिलेल्या एका वृत्तानुसार, मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत एक आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीमध्ये शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. नुकतीच मागासवर्गीय आयोगाची पुण्यात बैठक पार पडली होती.

त्यानंतर आज मुंबईत ही महत्वाची बैठक पार पडत असल्याने मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार का? याकडे सुंपर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मुंबईत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक होणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

२० जानेवारीला आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होत आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी या बैठकीतून आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुंबईतील मराठा समन्वयक देखील उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, आझाद मैदान आणि बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स याची देखील मराठा समन्वयक पाहणी करणार आहे.

मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा सेवकांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या मुंबईच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे. सकाळी ९ वाजता शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल होईल, अशी माहिती देखील समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT