mumbai sakal media
मुंबई

कोरोनातून बरे, झालेल्या रूग्णांना 'मूत्रमार्गात' संसर्गाचा वाढता धोका

मूत्रमार्गाला होणारा संसर्ग ही अत्यंत गंभीर व्याधी आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडमधून (Covid) बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये हृदयरोग (Heart Attack), मेंदूसंबंधी विकार, म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस (Black fungus) या आजारांची लक्षणं दिसून आली होती. परंतु, आता कोरोनातून (Corona) बरे झाल्यानंतर अनेक रूग्णांमध्ये मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय) (UTI) होत असल्याचं समोर येत आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Second Wave) 20 ते 60 वयोगटातील (AGE) कोविड रूग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे मूत्रमार्गात संक्रमण होत असल्याचे दिसून आले. यामागील नेमंक कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

मुंबईत राहणाऱ्या 35 वर्षीय अमिता जोशी (नाव बदललेलं) यांना जुलै 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. परंतु, काही दिवसांनी या महिलेला लघवी करताना जळजळ आणि प्रचंड वेदना जाणवत होती. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. पण, त्रास वाढू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय चाचणी केली असता या महिलेला मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय) झाल्याचे समोर आलं. कोरोनातून ठिक झाल्यानंतर या महिलेमध्ये मूत्रमार्गात संसर्ग झाल्याची लक्षणे विकसित झाली होती. हे लक्षात आल्यानंतर या महिलेवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही दिवसानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील यूरोलॉजिस्ट डॉ. तरूण जैन यांच्या म्हणण्यानुसार,  " कोरोनातून बरे झालेल्या अनेक रूग्णांमध्ये सध्या मूत्रमार्गात संसर्ग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रूग्णाला स्टेरॉईड दिले जाते. या औषधांचा अतिवापर केल्यास रूग्णामध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका संभवू शकतो. म्हणूनच पोस्ट कोविड रूग्णांमध्ये मूत्रमार्गात संसर्गाचे प्रमाण वाढत आहे

दरम्यान, मुंबईतील जेजे रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मूत्रसंसर्गाचे रुग्ण येत आहेत. पण, सर्वात जास्त कोविडनंतर लघवीमध्ये रक्तस्त्राव होणे, रक्ताच्या गाठी होऊन लघवी थांबणे अशा केसेस वाढलेल्या आहेत. शिवाय, रक्त पातळ आणि घट्ट होण्याच्या प्रक्रियेला कोविडमुळे बसलेला धक्का किंवा गुंतागुंत निर्माण झाल्याने रक्त लघवीवाटे जाणे ही सामान्य तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हा सामान्य आजार नसल्याने आधी महिन्याला एक किंवा दोन रुग्ण येत होते. पण, आता महिन्याला चार ते पाच रुग्ण ही समस्या घेऊन येत असल्याचे जेजे रुग्णालयाचे युरोलॉजिस्ट डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले आहे.

ही आहेत लक्षणे -   मूत्रमार्गाला होणारा संसर्ग ही अत्यंत गंभीर व्याधी आहे. मूत्रमार्गाचा संसर्ग हा संपूर्ण मूत्रप्रणालीतील कोणत्याही भागात होऊ शकतो. मूत्रप्रणालीमध्ये मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रवाहक नलिका आणि मूत्रमार्ग या चार घटकांचा समावेश होतो. लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून रक्त येणे, ताप, लघवीचा उग्र वास येणं, ओटीपोटात वेदना जाणवणं, मळमळ आणि उलट्या होणे अशा प्रकारची लक्षणे मूत्रमार्गाचा संसर्गामध्ये दिसून येतात.  हे त्रास जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास निदान होऊन योग्य उपचार घेतल्याने तो कमी होऊ शकतो. परंतु, या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढल्यास अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युटीआयची समस्या असणाऱ्या 35 ते 75 वयोगटातील साधारणतः 200 रूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. जीवनशैलीत बदल झाल्याने ही समस्या उद्भवतेय, असे युरोलॉजिस्ट डॉ. शेषांग कामत यांनी सांगितले.

हे उपचार महत्त्वाचे -

कोविड-19 मधून ठिक झाल्यानंतर या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणं गरजेचं आहे.

  • भरपूर पाणी प्यावेत,

  • पाणी पिण्याचे प्रमाण दहा टक्के वाढवावे.

  • लघवी होत असल्यास तातडीने जावे

  • कमोडचा वापर करण्यापूर्वी सीट स्वच्छ करावी.

  • महिलांनी शौचालयाचा वापर केल्यानंतर योनी आणि मूत्रमार्गात संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.

  • पाळीच्या दरम्यान प्रत्येकी दोन ते चार तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलावेत.

  • चॉकलेट, दुग्धजन्य पदार्थ आणि मसालेदार पदार्थ आहारातून टाळले पाहिजेत.

  • कॅफिनयुक्त पेये, मद्यपान, शीतपेये यापासूनही दूर राहणे गरजेचे आहे.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT