मुंबई

उर्मिला मातोंडकर इंस्टाग्राम अकाउंट हॅक ; सायबर पोलिसांनी दाखल केली FIR

सुमित बागुल

मुंबई : अभिनेत्री आणि नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची घटना १६ डिसेंबर रोजी घडली होती. या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला याबाबत तक्रार केली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी १६ तारखेला झालेल्या इंस्टाग्राम हॅकिंगबाबत पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी FIR दाखल करून घेत अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. उर्मिला मातोंडकर यांचं हॅक झालेलं इंस्टाग्राम अकाउंट १७ डिसेंबर रोजी पूर्ववत झालेलं.

याप्रकरणी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांअंतर्गत कलम ४३, ६६ आणि ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी उर्मिला मातोंडकर यांचा जबाब देखील नोंदवला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती.

उर्मिला यांनी केलेले ट्विट्स : 

आणि उर्मिला यांना अकाउंट हॅक झाल्याचं समजलं... 

उर्मिला यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हंटल आहे की, डिसेंबर १६ रोजी मला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लिंक प्राप्त झाली. जेंव्हा मी त्या लिंकवर क्लिक केलं तेंव्हा मला इंस्टाग्राम लॉगिन करण्यास सांगण्यात आलं. आपल्या अकाउंटशी जोडलेला पासवर्ड टाकल्यावरदेखील मला माझं अकाउंट वापरता आलं नाही. त्यानंतर मी पासवर्ड रिसेट करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र अकाउंट रिकव्हरीसाठी दुसऱ्याच कोणत्या नंबरवर मेसेज पाठवला गेला आणि तेंव्हा मला समजलं की माझं अकाऊंड हॅक करण्यात आलं आहे.  

उर्मिला यांनी पोलिसांना सांगितलं की, अज्ञात हॅकरकडून त्यांच्या अकाउंटचा रिकव्हरी नंबर, रिकव्हरी इमेल आणि अकाउंटमधील सर्व पोस्ट डिलीट करण्यात आलेल्या आहेत.     
Urmila Matondkar Instagram account hack case mumbai police cyber cell files FIR

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT