मुंबई - अतिदुर्मीळ प्रकारातील गर्भाशय काढण्‍यात यशस्‍वी झालेले डॉक्‍टरांचे पथक.
मुंबई - अतिदुर्मीळ प्रकारातील गर्भाशय काढण्‍यात यशस्‍वी झालेले डॉक्‍टरांचे पथक. 
मुंबई

तरुणाच्या पोटात आढळले गर्भाशय!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील एका तरुणाच्या पोटात गर्भाशय असल्याचे आढळले आहे. राज्य सरकारच्या भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी या तरुणावर महिनाभरापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया केली. हा अतिदुर्मीळ प्रकार असून जगात आतापर्यंत फक्त २०० पुरुषांमध्ये गर्भाशय आढळले आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘फिमेल प्रायमरी म्युलिरियन डक्‍ट सिंड्रोम’ असे म्हणतात. 

अँटीम्युलिरियन हार्मोनची कमतरता असल्यामुळे या तरुणाच्या पोटात गर्भाशय तयार झाले होते. लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतरही मूल होत नसल्यामुळे हा २९ वर्षांचा तरुण वंध्यत्वनिवारण उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात आला होता. त्याच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे आढळले. त्याचे वृषण अंडकोशात नसून, पोटातच असल्याचे (अनडिसेंडेड टेस्टिस) प्राथमिक तपासणीत निदान झाले. ही समस्या दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकट गिते यांनी घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान या तरुणाच्या पोटात गर्भाशयाच्या आकाराचा अवयव आढळला. त्यामुळे शस्त्रक्रिया तत्काळ स्थगित करून डॉक्‍टरांनी त्याच्‍या विविध चाचण्या केल्या. त्यावरून या तरुणाच्या पोटात गर्भाशय असल्याचे निश्‍चित झाले.

ही शस्त्रक्रिया तीन तास चालली. त्याचे वृषण अंडकोषात सरकवण्यात आले आहेत. अशा रुग्णांना पुढे अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्‍यता असल्यामुळे ही शस्त्रक्रिया आवश्‍यक असते. आतापर्यंत जगात फक्त २०० पुरुषांमध्ये गर्भाशय आढळल्याची नोंद असल्याचे डॉ. गिते यांनी यावेळी सांगितले.

ब्रिटिश जर्नल युरोलॉजी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पत्रिकेनुसार आतापर्यंत पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याची २०० प्रकरणे जगभरात आढळली आहेत. अंडाशय अंडकोशात आहे की नाही, हे फक्त स्पर्शाने समजू शकते. या समस्येचे निदान अगदी लहानपणीही होऊ शकते. त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे.
- डॉ. व्यंकट गिते, युरोलॉजी विभागप्रमुख, जे. जे. रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT