Mumbai Crime sakal media
मुंबई

सोडून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळ, पतीला अटक

मुलीला फॅनला लटकवले, मुलाचा मृत्यू झाल्याचे दाखवले

अनिष पाटील

मुंबई : पत्नी (wife) सोडून उत्तर प्रदेशात (uttar pradesh) गेली म्हणून तिला परत आणण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळणा-या पतीला (husband arrest)) कुरार पोलिसांनी (kurar police) अटक केली. त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल (murder case) करण्यात आला आहे. आरोपी पती मद्यपी व अंमली पदार्थांचा नियमीत सेवन करत असल्याची माहिती समजली आहे. अजय गौड (ajay gaud) (30) असे अटक आरोपीचे नाव असून तो मालाड (malad) (पू.) येथील कुरार परिसरातील रहिवासी आहे.

गौड व्यवसायाने रंगकाम करणारा असून दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असल्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. 13 वर्षाची मुलगी, आठ वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी व नऊ महिन्याची मुलगी अशी आरोपीचा चार मुले आहेत. आरोपीची पत्नी चारही मुलांना घेऊन उत्तर प्रदेशात गेली होती. पण शाळा सुरू होऊन या आशेने तिने दोन मोठ्या मुलांना मुंबईला पाठवले. तो मुलांनाही मारहाण करत होता. तसेच पत्नी परत येण्यास तयार नसल्यामुळे तो संतापला होता. पत्नीला परत आणण्यासाठी त्याने स्टंट करण्याचे ठरवले व मुलांचे जीव धोक्यात घातले.

शनिवारी रात्री त्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी मुलाला जमीनीवर झोपण्यास सांगितले व त्याच्या अंगावर पांढरा कपडा घातला. त्यानंतर त्याचे छायाचित्र घेतले. तेवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने गळफाश बनवला व पंख्याला बांधून तो मुलीच्या गळ्यात घातला. त्यानंतर तिला बादलीवर उभी राहण्यास सांगितले. त्याने मुलीला बादलीवरून उडी मारण्यास सांगितले. अन्यथा तो बादली पाडेल, अशी धमकी दिली. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करणण्यास सुरूवात केला. तिचा आवाज ऐकून शेजारच्यांनी गौडच्या घरी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. शेजारी राहणा-या व्यक्तींनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात भादंवि कलम 307 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT