Vaccination camp societies children Mumbai vaccinated Mission  purpose municipality
Vaccination camp societies children Mumbai vaccinated Mission purpose municipality sakal
मुंबई

मुंबई : सोसायट्यांमध्ये लस शिबिर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण राज्यात १२ ते १४ वयोगटातील लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत लसीकरणाचा वेग कमी आहे. जवळपास २५ टक्के मुलांनीच आतापर्यंत लशीचा पहिला डोस घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबईतील सोसायट्यांमध्ये शिबीर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

राज्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी १६ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ४ लाख लोकसंख्येपैकी जवळपास ९८ हजार मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. यात मुंबईचे लसीकरण राज्याच्या सरासरीपेक्षा (५२ टक्के) अर्धे आहे. त्यामुळेच पालिकेने सोसायट्यांमध्ये शिबिर भरवून लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

१२ ते १४ वयोगटातील लसीकरणात सांगली जिल्हा आघाडीवर असून तेथे जवळपास ७५ टक्के लसीकरण झाले आहे.

लसीकरण वाढवण्याचा सूचना

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, की प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याला लसीकरणाचा आढावा घेऊन ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना दिल्या आहेत. १२ ते १४ वयोगटातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि १५-१७ जवळपास ४३ टक्के मुलांचे लसीकरण बाकी आहे. आता शाळाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे, सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिरे जास्तीत जास्त प्रमाणात राबवले जाऊ शकतात. यासह सोसायट्याही प्रभाग कार्यालयात जाऊन याबद्दल विचारणा करू शकतात. जरी ८ ते ९ लहान मुले असतील तरी पालिका तिथे लसीकरण राबवणार असल्याचे गोमारे यांनी सांगितले.

प्रतिसाद नाहीच... : मुलांच्या लसीकरणाबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळेही या लसीकरणाचा वेग वाढताना दिसत नाही. याच कारणातून सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबीरे भरवल्यानंतरही त्याला हवातसा प्रतिसाद मिळत नाही, असे एका सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान, बालरोग तज्ज्ञ कोविड टास्क फोर्स सदस्यांनी कोणत्याही विषाणूपासून बचावासाठी लसीकरण हे महत्त्वाचे हत्यार असल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT