मुंबई

मुंबईत लसीकरण नियोजनाला फटका; कोविन ऍपमध्ये समस्या सुरूच

मिलिंद तांबे

मुंबई  : लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या सुरूच असून त्यामुळे पालिकेच्या लसीकरण नियोजनाला ब्रेक लागला आहे. तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्‍यता असली; तरी लसीकरण सुरूच राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकाणी यांनी दिली. 

राज्यासह मुंबईतदेखील 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी पालिकेने 10 केंद्रांवर जय्यत तयारीही केली. पहिल्या दिवशी चार हजार जणांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात 1,926 जणांचेच लसीकरण झाले. कोविन ऍपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील दोन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. मंगळवारपासून पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली; मात्र कोविन ऍपमधील तांत्रिक समस्या कायम असल्याने लसीकरणात पुन्हा एकदा समस्या जाणवल्या. धीम्या गतीने लसीकरण सुरू असून मंगळवारीदेखील केवळ 1,596 जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे पालिकेचे चार हजार लसीकरणाच्या नियोजनाचे लक्ष्य पूर्ण होऊ शकलेले नाही. 

दोन दिवसांच्या स्थगितीनंतर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली; मात्र कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या अद्याप सुरूच आहे. याबाबत आम्ही सरकारशी संवाद साधल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन दिवसांत ऍपमधील तांत्रिक अडचणी दूर होऊन नियोजनानुसार पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात करू, असा विश्‍वासही काकाणी यांनी व्यक्त केला. 
....... 

काय आहेत अडचणी 

  • - ऍप अपेक्षेपेक्षा धीम्या गतीने सुरू 
  • - एकाच नावाची दोनदा नोंद होणे 
  • - डेटा एण्ट्रीसाठी अधिक वेळ लागत आहे 
  • - गरोदर महिलांची नोंद करण्यासाठी वेगळा कॉलम नाही 
  • - दीर्घकालीन आजारी असणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्याची व्यवस्था नाही 


Vaccination planning hit in Mumbai Problems continue in the Covin app

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT