Bridge Repairing sakal
मुंबई

Mumbai News : वाकोला-सांताक्रूझ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्ताराचा पहिल्या टप्प्यातील वाकोला-सांताक्रूझ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम झाले पूर्ण.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्ताराचा पहिल्या टप्प्यातील वाकोला-सांताक्रूझ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएच्या निर्देशानुसार कंत्राटदाराने हे खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले.

फेब्रुवारी महिन्यात लोकार्पण झालेल्या या मार्गावर चारच महिन्यात खड्डे पडल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर दै. सकाळच्या वृत्तांनंतर तात्काळ एमएमआरडीए प्रशासनाने कंत्राटदाराला स्वखर्चाने खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कंत्राटदाराने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून या मार्गातील खड्डे बुजविले.

बीकेसी व कुर्ला याभागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या नव्या उड्डाणपुलाची एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारणी करण्यात आली. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्ताराचा पहिल्या टप्प्यातील ३ किमीची मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

६४५ कोटी रुपये खर्चून या मार्गाची उभारणी करण्यात आली. मात्र उड्डाणपुलाच्या उभारणीनंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अशातच पहिल्याच पावसात कपाडिया नगर येथील कुर्ला वरून सांताक्रूझच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील खड्ड्यामुळे नागरिकांना या पुलावरून वाहतूक करणे त्रासदायक झाले होते. मात्र, एमएमआरडीएच्या देखरेखीत कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले असून या मार्गिकांवरून वाहतूक सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decisions: राज्यातील शिक्षकांना UGCच्या निर्देशानुसार मिळणार मूळ वेतन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय!

लालपरीला मिळणार ग्लॅमर! रितेश जिनिलिया STचे सदिच्छा दूत; मंत्री सरनाईकांची घोषणा

Crime News: माझ्या पतीचा नाद सोड म्हणत, तंबी, मनात राग धरून प्रियकराच्या पत्नीचाच तिने काटा काढला! छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर हादरले

Latest Marathi News Live Update: देवगड समुद्रात पर्ससीन नौका बुडाली, १५ ते २० खलाशांचे प्राण वाचले

कसलं भारी! सुबोध आणि तेजश्रीचा धमाल डान्स पाहून नेटकरी खुश; वृद्धाश्रम वाचवायला होणार त्याची झक्कास एंट्री!

SCROLL FOR NEXT