Valentine Day sakal
मुंबई

Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करताना जोडप्यांना पोलिसांचा त्रास; पोलिसांकडून जाचाचा आरोप

मुंबई शहरातील प्रसिद्ध ठिकाणी 'व्हॅलेंटाईन डे' वीक साजरा करताना पोलिसांकडून जोडप्यांचा छळ झाल्याचा आरोप जोडप्यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शहरातील प्रसिद्ध ठिकाणी 'व्हॅलेंटाईन डे' वीक साजरा करताना पोलिसांकडून जोडप्यांचा छळ झाल्याचा आरोप जोडप्यांनी केला आहे. व्हॅलेंटाईन डे अगदी जवळ आला आहे. यासोबतच जोडप्यांनी आधीच व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या आधी, मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणी भेट देणाऱ्या अनेक जोडप्यानी नैतिक पोलिसांकडून छळ केल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत. तसेच स्थानिक रहिवाशांनी पोलिस कर्मचारी बागेत गैरवर्तन करणाऱ्या जोडप्याकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

व्हॅलेंटाईन सप्ताहाचा उत्साह

व्हॅलेंटाईन सप्ताहमध्ये मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेल्या हँगिंग गार्डनमध्ये काही वेळ घालवण्यासाठी पार्कला भेट देणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रेमाच्या या आठवड्यात काही जोडप्यांना त्यांच्या भेटीदरम्यान वाईट अनुभवाचा सामना करावा लागला आहे. पोलिसांकडून त्यांचा छळ केल्याचा आरोप जोडप्यानी केला आहे.

हँगिंग गार्डन हे नेहमीच जोडप्यांचे आवडते ठिकाण राहिले आहे. येथे अनेक पर्यटक तसेच कुटुंबे स्थानिकांसह संध्याकाळच्या फेरफटका मारताना जोडपी आढळतत.

जोडप्यांच्या तक्रारी

हँगिंग गार्डन सारख्या ठिकाणी भेट देणाऱ्यां आनेक जोडप्यानी त्यांचे अनुभव सांगितले आहे. एका जोडप्याने बागेत चुबन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच जोडप्याला दंड भरल्याशिवाय सोडण्यात आले नाहीत.

अशाच प्रकारच्या एका घटनेत हँगिंग गार्डनमध्ये पोलिसांनी जोडप्यांना मिठी मारण्यापासूनन प्रतिबंधित केले. सोबतच त्याच्या सोबत धमकवून बागेच्या बाहेर पडण्यास भाग पाडले. येथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशानी देखील पोलीस कर्मचारी जोडप्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Hapus Mango Crisis : चक्रीवादळ ते अवकाळी पाऊस; जागतिक कीर्तीचा हापूस आंबा आता धोक्यात? वाचा सविस्तर रिपोर्ट

प्रेमासाठी धर्म बदलायला तयार होती नयनतारा, मग का नाही झालं प्रभुदेवाशी लग्न? 'त्या' अटींमुळे होत्याचं नव्हतं झालं

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

Solapur Hyderabad Flight : सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! 17 एप्रिलपासून विमान प्रवासाचं गणित बदलणार; पहा नवीन वेळापत्रक

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

SCROLL FOR NEXT