'वंदे भारत' ट्रेन Sakal
मुंबई

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती

दोन कोटी १५ लाख प्रवाशांनी केला प्रवास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशभरात वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. ३१ मार्च २०२४ पर्यत दोन कोटी १५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहेत. चालू आर्थिक वंदे भारत ट्रेनची प्रवासी ऑक्पेंयूसी क्षमता सुद्धा वाढली आहे. तसेच आता लवकरच मुंबई ते कोल्हापूरदरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार आहे. यांसंदर्भात रेल्वेकडून निजोजन सुरु केले असल्याची माहिती मिळत आहे.

प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा,आरामदायी प्रवास द्यावा या दृष्टीने भारतीय रेल्वे मेड इन इंडियाअंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरु केला आहे. वंदे भारत ट्रेन सारख्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या देशभरात १०२ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. ३१ मार्च २०२४ पर्यत २ कोटी १५ लाख प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला आहे. ७ मे रोजी देशभरातील वंदे भारतची प्रवासी आऱक्षण ९८ टक्के होती. चालू आर्थिक वर्षात ७ मे पर्यंत सरासरी आऱक्षण दर १०३ टक्के आहे. यावरून वंदे भारतला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. सध्या वंदे भारत देशातील २८४ जिल्ह्यातून धावतात.

लवकरच वंदे भारत

महालक्ष्मी आणि कोयना एक्सप्रेस सध्या मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावतात.सह्याद्री एक्सप्रेस बंद झाल्यापासून या एक्सप्रेसला प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याची मागणी गेल्या काही महिन्यापासून होत आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करता रेल्वेने मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत चालविण्याचे नियोजन रेल्वेने सुरु केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT