Accident Sakal
मुंबई

Mumbai Accident : नजर हटी दुर्घटना घटी! वांद्रे येथे झालेल्या अपघाताचे कारण समोर

या अपघातात ५ जणांचा झाला होता मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर दसऱ्याच्या दिवशी पहाटे झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. जी क्रेटा गाडी अपघातग्रस्त गाड्यांना जाऊन आदळली होती त्या गाडीचा चालक इरफानने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता आणि हाच मोबाईल अपघाताचे कारण ठरला आहे. दरम्यान या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

(Vandre-Worali C-Link Accident Latest Updates)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचे टायर फुटल्याने अगोदरच या रस्त्यावर एका गाडीचा अपघात झाला होता. या अपघातातली जखमीला नेण्यासाठी आणि गाडी काढण्यासाठी क्रेन आणि अॅम्ब्युलन्स आली होती. त्यानंतर एक गाडी येऊन त्या अपघातग्रस्त गाडीला आणि अॅम्ब्युलन्सला धडकली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

तर दुसऱ्या गाडीतील चालक इरफानने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या फोनची चार्जिंग संपली होती आणि त्याचवेळी तो त्याचा फोन चार्जिंगला लावत असताना त्याचे लक्ष भरकटले आणि अपघात झाला. तर या अपघातात चार्जिंग नसलेला फोन कारणीभूत ठरला आहे.

अपघातात पाच जणांचा मृत्यू

या अपघातात अॅम्ब्युलन्स चालक सोमनाथ साळवे, टोल कर्मचारी सत्येंद्र फौजदाल, राजेंद्र राजपूत, गजराज राजपूत आणि कदम यांचा मृत्यू झाला आहे.

आरोपी उपचार घेऊन घरी गेला

दुसऱ्या गाडीचा चालक इरफान हा या अपघातात जखमी झाला होती तर त्यालाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तो उपचार घेऊन घरी गेल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर गाडीच्या नंबर प्लेटवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अटक केली आहे.

वाहने नेण्यास मनाई असताना वाहने घातल्याने अपघात

वरळी सी लिंकवर थांबण्यास मनाई असतानाही काही गाड्या या ५ ऑक्टोबर रोजी सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या वाहनाने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर वायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT