varsha gaikwad becomes 1st-woman chief of mumbai congress replaces bhai jagtap ahead of civic polls
varsha gaikwad becomes 1st-woman chief of mumbai congress replaces bhai jagtap ahead of civic polls Sakal
मुंबई

Varsha Gaikwad : मागास आणि अल्पसंख्यांक कॉंग्रेसशी जोडणे; वर्षा गायकवाड यांच्यापुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मागास आणि अल्पसंख्याकांवर कॉंग्रेसची मदार आहे. या घटकांची व्होट बॅंक टिकवून ठेवण्यासाठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभीवर नवनिर्वाचित अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यापुढे आव्हान असणार आहे. निवडणूकीत पक्षाला यश मिळवून देणे ही त्यांच्यासाठी कसोटी आहे.

वर्षा गायकवाड या धारावीत चार वेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महिला व बालकल्याण या महत्वाची खात्याच्या जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या कार्यकाळात युनो मध्ये ग्लोबल लिडर म्हणून त्यांचे भाषण झाले होते. गुजरात, राज्यस्थान, बिहार, मध्यप्रदेश या राज्यात झालेल्या निवडणुकीत त्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती.

नुकत्याच झालेले कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत गुलबर्गा जिल्ह्याची जबाबदारी सोपविली होती. तेथील आठ पैकी सहा जागा जिंकून आणल्या. भारत जोडो अभियानाची हिंगोली येथे जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. राहूल गांधी यांच्या निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच त्याची मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

मागास वर्ग आणि अल्पसंख्यांक हे घटक मुळ कॉंग्रेसचे आहेत. मात्र गेल्या काही वर्षात हे घटक कॉंग्रेसपासून दुरावला होते. त्यांना पुन्हा कॉंग्रेस पक्षात जोडण्याचे काम आता त्यांना करावे लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकीत यश मिळविणे हे वर्षा गायकवाड यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.

त्यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांच्याकडेही मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. वडिलांचा अनुभव अध्यक्षपदासाठी फायदा होणार आहे. पक्षातील गटबाजी दूर करून पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी तसेच पालिका निवडणुकीपाठोपाठ येणा-या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची मोठी कसोटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT