Sandip Deshpande 
मुंबई

Sardesai Vs Deshpande: "चिल्लर लोकांवर बोलणार नाही"; देशपांडेंच्या आरोपांवर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंगवॉक दरम्यान काही लोकांनी हल्ला केला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंगवॉक दरम्यान काही लोकांनी हल्ला केला होता. यानंतर देशपांडे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून एफआयआर देखील दाखल झाला आहे. या एफआयआरमध्ये त्यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि सचिव वरुण सरदेसाई यांचा उल्लेख केला आहे. यानंतर आता सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Varun Sardesai reacts to MNS leader Sandip Deshpande allegations regarding attack on him)

संदीप देशपांडे यांनी एफआयआरबाबत पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, "माझं सविस्तर म्हणणं मी एफआयआरमध्ये मांडलं आहे. मला जे वाटतं ते मी पोलिसांना सांगितलं आहे, पोलीस त्या गोष्टीचा तपास करत आहेत. मला जे मारणारे होते त्यांच्या तोंडून मला जे ऐकू आलं ते मी पोलिसांना सांगितलं आहे. आज ते या ठिकाणी बोलणं योग्य ठरणार नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे, आरोपींची अटक होऊन त्यांची चौकशी होऊ द्या, त्यानंतर मी यावर सविस्तर बोलेन"

देशपांडे यांच्या या विधानानंतर त्यावर वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरदेसाई यांनी म्हटलं की, या देशात प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कोण काय बोलतं? आणि एखादा व्यक्ती बोलल्यानंतर तो व्यक्ती काही इतका मोठा नाही की आम्ही लगेच त्यावर रिअॅक्ट करावं. त्यामुळं अशा चिल्लर लोकांवर फारकाही बोलण्याची मला गरज वाटत नाही. स्वतःच्या प्रसिद्धी करता किंवा सिक्युरिटी मिळवण्याकरता त्यांनी हे केलं असेल हा त्यांचा त्यांचा विषय आहे. पण आम्हाला स्वारस्य आमचा पक्ष वाढवण्यात आहे, संघटना वाढवण्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Gas Cylinder Shortage: बीडमध्ये घरगुती-व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; ग्राहक रांगेत; साठा असूनही गॅस नाही

Latest Marathi News Live Update : ओडिशात आगीत दहा रुग्णांचा मृत्‍यू

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

Pandharpur News: पंढरपुरातील इस्काॅन मंदिरात प्रसादासाठी पेटल्या चुली; अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका, भाविकांच्या भोजनावर मर्यादा!

Beed Road Construction Issue: रस्ता कामाला अडथळ्यांचा फेरा; बीडमध्ये चौपदरीकरणाचा वेग मंदावला; खोदकाम, धुळीचे लोट आणि वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT