Virar-Covid-Patient-Ramchandra-Das
Virar-Covid-Patient-Ramchandra-Das E-Sakal
मुंबई

आजोबांचं क्वारंटाइन संपलं; नातेवाईक आणायला गेले अन् बसला धक्का

संदीप पंडित

विरारच्या कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार पाहून चक्रावून जाल

विरार (मुंबई): मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या कोरोना रूग्णवाढीचा (Corona Active Cases) दर कमी होताना दिसतोय. वसई विरार महापालिका (Vasai Virar Municipal Corp) हद्दीत सध्या रूग्णांची संख्या काहीअंशी वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची (Vaccination) मोहीम सुरू आहे. तशातच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वरुण कोवीड रुग्णालयात (Covid Center) एक चक्रावून टाकणारा प्रकार घडला. कोरोना बाधित (Covid Positive) असलेल्या ८२ वर्षांच्या रुग्णाचा क्वारंटाइन (Quarantine) कालावधी संपणार म्हणून त्याचे नातेवाईक त्याला घेण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमध्ये गेले आणि तेथे जाऊन त्यांन प्रचंड मोठा धक्का (Shocking) बसला. तो रूग्ण काही दिवसांपासून गायब (Missing) झाल्याची माहिती मिळताच प्रचंड खळबळ माजली. आता या प्रकरणावरून पालिका अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. (Vasai Virar Covid Center Shocking Incidence 82 years old Ramchandra Das Missing from Center)

वसई-विरारच्या एका परिसरात रामचंद्र दास (82) यांना 22 एप्रिल रोजी रात्री 7:45 वाजता उपचारासाठी पालिकेच्या वरूण इंडरस्ट्रीज येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचाराचे 14 दिवस 5 मे रोजी पूर्ण झाल्यामुळे त्यांना घरी आणण्यासाठी कोवीड सेंटरमध्ये नातेवाईक गेले. तेथे गेल्यानंतर रामचंद्र दास हे रुग्ण सेंटरमध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यांची सरकार दप्तरी नोंद तपासण्यात आली, पण त्यातही काही नोंद आढळली नाही.

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांनीही चौकशी केली. पण रामचंद्र दास यांच्याबद्दल त्या ठिकाणी काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना कल्पना देऊन वरुण कोवीड सेंटरमधून रामचन्द्र दास गेले कुठे? या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती. यावर अखेर पालिका उपायुक्त किशोर गवस यांनी चौकशीचे आदेश दिले.

या प्रकरणात नक्की काय घडतंय हे समजत नसल्यामुळे अखेर रामचंद्र दास यांच्या परिवाराने पीपीईटी घालून दोन बेवारस मृतदेह जाऊन बघितले. पण त्यातही रामचंद्र दास नव्हते. त्या दरम्यान पत्रकार नरेंद्र पाटील यांनी डॉक्टर पाल यांना संपर्क केला. परंतु त्यांचा मोबाईल बंद होता.

याबद्दल पत्रकार नरेंद्र पाटील यांनी मनपाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठवला आणि पुढील सवाल केले.

  1. अखेर कुठे गेले रामचन्द्र दास? वरुण कोवीड रुग्णालयात सुरक्षारक्षक असताना रुग्ण गेला कुठे?

  2. समजा तो पळून गेला असेल, तर त्याची वालीव पोलिस ठाण्यात नोंद का केली गेली नाही?

  3. जर त्यांना ५ मे रोजी सोडण्यात आले असेल, तर याबद्दल ज्या व्यक्तींनी त्यांना दाखल केले होते त्यांना माहिती का दिली गेली नाही?

  4. त्यांची प्रकृती खालावली असेल आणि त्यांना दुसरा रुग्णालयात हलवण्यात आले असेल, तर याची दप्तरी नोंद का नाही?

  5. जर रामचन्द्र दास यांचा मृत्यू झाला असेल, तर त्याची नोंद दाखल करणाऱ्यांना का देण्यात आलेली नाही?

रामचंद्र दास यांच्या बाबतीत आम्हाला गेल्या ६ दिवसापासून कोणतीही माहिती पालिका प्रश्नाकडून देण्यात येत नाही चौकशी साठी गेल्यावर दुसर्या दिवशी या असे सांगितले जाते. रामचंद्र दास हे नक्की कुठे आहेत? त्यांचे काय झाले आहे . कारण ते एकटे फिरू शकत नसल्याने काळजी वाटत आहे . आयुक्तांनी याबाबत लवकरात लवकर त्यांना शोधून काढावे.

-गोराचन्द मुखर्जी , रामचंद्र दास यांचे नातेवाईक

----------------------------------------------------------------

वरूण इंडरस्ट्रीज येथील कोविड सेन्टरमधील रुग्ण गायब झाल्याच्या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून लवकरच याबाबतची माहिती देण्यात येईल.

-किशोर गवस , उपायुक्त, वसई विरार महानगर पालिका

(संपादन-विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT