vasai virar municipal sakal media
मुंबई

महापालिका निवडणुकीत तिकीट देताना बविआ नगरसेवकांचे प्रगती पुस्तक तपासणार

संदीप पंडित

विरार : वसई-विरार महानगरपालिकेची (vasai-virar municipal) गेल्या वर्ष भरापासून रखडलेली निवडणूक (election) कधीही लागण्याची श्यक्यता असल्याने आता निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या माजी नगरसेवकांनीही (corporators) पुन्हा एकदा निवडणुकीत उभे राहण्यासाठी पॅड बांधण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या प्रगती पत्रकावरील आधारानेच तिकीट मिळण्याचे (election ticket) संकेत आघाडीच्या नेत्या काढून मिळाल्याने. ज्यांच्या प्रगतीवर लोकांच्यात जाऊन काम न केल्याचा शेरा असेल त्याला तिकीट नाकारले जाण्याची श्यक्यता वर्तविण्यात येत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

वसई-विरार पालिकेत गेल्या पाच वर्षात नगरसेवक म्हणून लोकांची किती कामे नगरसेवकांनी केली आहेत. तसेच ते लोकांच्या संपर्कात किती राहिले आहेत. आणि महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या काळात लोकांच्या मध्ये राहून किती काम केले आहे याचा लेखाजोखा घेण्यात येणार असल्याचे संकेत बविआच्या नेतृत्वाने दिल्याने आता पर्यंत फक्त मोठमोठ्या गाड्यातून फिरताना कार्यकर्ते आणि लोकांपासून लांब राहिलेल्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात अनेक नगरसेवक लोकांपासून लांब होते.

तर अनेक नवीन कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांच्यात जाऊन कामे करत होते. याचाही विचार बविआ नेतृत्व करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर बविआ मध्ये कार्यकर्त्यांच्या शब्दाला मोठी किंमत असल्याने कार्यकर्ते सुचवतील त्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा रिवाज आहे. याठिकाणी पक्ष नेतृत्वाकडे जाणाऱ्याला परत पाठवले जाते. त्यामुळे यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आता नव्याने बदलणारी प्रभाग रचना, आरक्षण यामुळे अनेकांना पुन्हा नगरसेवकाची लॉटरी लागण्याची आस लागली आहे. त्यामुळे आरक्षणामुळे ज्यांचे पत्ते कापले गेले आहेत त्यांनी हि पक्षाच्या श्रेष्ठीकडे फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळी उमेदवारीचे निकष बदलले जाणार असल्याने बविआची उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

"बहुजन विकास आघाडी मध्ये उमेदवारी देताना पक्ष प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर हे कार्यकर्त्याच्या मताला प्राधान्य देत आले आहेत. यावेळी हि तीच पद्धत असणार आहे. त्याच बरोबर आमच्याकडे सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण असल्याने सोशल इंजिनिअरिंग सांभाळले जात आहे. "

- प्रवीण शेट्टी , माजी महापौर वसई विरार महानगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT